Nashik Shirdi Accident : ट्रक - बस अपघाताचं भीषण वास्तव दाखणारी दृश्य । पाहा फोटो

Fri, 13 Jan 2023-11:42 am,

Nashik Sinnar Shirdi Highway Accident :  सिन्नर-शिर्डी महामार्गावर पहाटेच्या सुमारास मोठा भीषण अपघात झाला. या अपघातात 10 साईभक्तांचा मृत्यू झाला. तर 12 जण गंभीर जखमी झालेत. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.  जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

नाशिक शिर्डी महामार्गावरील हा अपघात इतका भीषण होता की बसचा चेंदामेंदा झाला आहे. पहाटेच्यावेळी बसमधील प्रवासी झोपेत होते. अपघात झाला त्यावेळी मोठा आरडाओरडा ऐकू आल्याचे येथे उपस्थित असल्याने सांगितले.

शिर्डी येथील साईंच्या दर्शनासाठी ठाणे, अंबरनाथ परिसरातील भाविक खासगी बसने जात होते. बसमध्ये 50 लोक होते. नाशिक शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघातात खासगी बसमधील 10 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर 12 जण गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन याविषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात आत्तापर्यंत दहा जण ठार झाले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले

नाशिक शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातासंदर्भात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

हा अपघात इतका भीषण होता की बसचा चेंदामेंदा झाला आहे. पहाटेच्यावेळी बसमधील प्रवासी झोपेत होते. अपघात झाला त्यावेळी मोठा आरडाओरडा ऐकू आल्याचे येथे उपस्थित असल्याने सांगितले. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ही बस अंबरनाथहून येत होती. बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्यानंतर अपघात झाला.

अंबरनाथ, ठाणे परिसरातील 50 प्रवासी या बसमधून शिर्डीचा प्रवास करत होते. मात्र रस्त्यातच 10 प्रवाशांचा मृत्यू झाला. एका व्यक्तीचा चेहरा आणि धड वेगळे झाल्यानं त्याची ओळख पटलेली नाही. इतर जखमींना पुढील उपचारासाठी सिन्नर, नाशिकमध्ये हलवण्यात आले आहे. भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाल्यापैकी सात महिला आणि तीन पुरुषांचा समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link