New Year 2023 : पार्टीला एकच प्याला भारी झाला? `या` घरगुती उपायांनी घालवा हँगओव्हर

Sat, 31 Dec 2022-12:24 pm,

नव्या वर्षाची सुरुवात हँगओव्हरनं (home remedies to cure hangover ) न करता तो कोणत्या घरगुती उपायांनी दूर कराल ते एकदा पाहा. 

 

टोमॅटो ज्यूस (tomato juice)- टोमॅटोच्या रसामध्ये ग्लुकोज आणि साखरेतील असे काही घटक असतात ज्यामुळं अल्कोहोल पचायला मदत होते. त्यामुळं रक्तातील अल्कोहोलचं प्रमाण कमी होतं. हँगओव्हर झालाय टोमॅटोचा ज्यूस घ्या. 

आलं (ginger) - मद्यसेवनानंतर पोटामध्ये होणारी जलजळ दूर करण्यासाठी आणि हँगओव्हर घालवण्यासाठी आलंही फार मदत करतं. यामुळं मळमळही होत नाही. कच्च आलं किंवा आल्याचा रस तुम्ही हँगओव्हर घालवण्यासाठी खाऊ शकता. 

कच्चं सफरचंद किंवा केळी (apple and banana)- फ्रुट सलाड किंवा कच्ची फळं हँगओव्हर मोठ्या प्रमाणात कमी करतात. त्यातही काहीसं कच्चं सफरचंद आणि केळं मोठ्या फायद्याचं. रिकाम्या पोटी होणारी डोकेदुखी यामुळं कमी होते. 

पोटभर नाश्ता (breakfast)- रात्रभर केलेल्या पार्टीनंतर सकाळी डोकं भणभणल्यास आधी पोटभर नाश्ता करा. यामुळं मद्यसेवनादरम्यान तुमच्या शरीरातील गमावलेली पोषक तत्व परत मिळवण्यास मदत होते. 

भरपूर पाणी प्या (water)- अल्कोहोल किंवा मद्यसोवनानं तुमच्या शरीरातील पाणी कमी होतं. त्यामुळं सकाळी उठून तुम्हाला तहानल्यासारखं जाणवू शकतं. घाबरु नका, भरपूर पाणी प्या, शांत बसा. बरं वाटेल. 

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link