भारतातील अद्भुत मंदिर, जे 6 महिने असते पाण्याखाली; जिथे शिवभक्तांना येते प्रचिती

Pravin Dabholkar Tue, 18 Jun 2024-2:05 pm,

Nilkantheshwar Mahadev Temple : सनातन धर्मात देवांचे देव महादेवाचे स्थान सर्वोच्च आहे. देशात भगवान शिवाला समर्पित अनेक मंदिरे आहेत. भगवान शंकराची मंदिरे त्यांच्या गूढतेमुळे प्रसिद्ध आहेत. 

गुजरातमधील नीलकंठेश्वर महादेव मंदिर यापैकी एक आहे. हे मंदिर राजपूत शासक राजा चौकाराने बांधले होते. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे नीलकंठेश्वर महादेव मंदिर वर्षातील 6 महिने पाण्याखाली आणि 6 महिने बाहेर पाण्याबाहेर दिसते.

त्यामुळे हे मंदिर आजही श्रद्धेचे केंद्र आहे.येथे भगवान शंकर वास करतात, अशी भाविकांची आस्था आहे. तसेच येथील मंदिरात येऊन भोलेनाथाकडे जे काही मागू त्या इच्छा पूर्ण होतात, अशीदेखील भाविकांची आस्था आहे.  

निलकंठेश्वर महादेव मंदिर गुजरातच्या बडोद्यापासून 124 किमी अंतरावर जुनराज गावात आहे. या मंदिराच्या चहुबाजूने फक्त पाणी आहे. मंदिरापर्यंत पोहोचायचे असेल तर भाविकांना बोटीचा आधार घ्यावा लागतो. 

हे मंदिर 500 वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. पुरातनकालिन ही वास्तू पाहण्यासाठी देशभरातून लाखो भाविक, पर्यटक इथे येतात. मंदिराच्या गर्भगृहात भगवान शंकराची मूर्ती आहे.

नीलकंठेश्वर महादेव मंदिर सहा महिने पाण्यात बुडालेले असते. आणि ६ महिने पाण्याबाहेर असते. पावसाळ्यात धरण पाण्याने भरते. त्यामुळे मंदिर पाण्यात बुडते आणि पाणी ओसरल्यावर बाहेर दिसू लागते. 

मंदिरात पाणी भरताना भगवान भोलेनाथ मंदिरात वास करतात अशी लोकांची श्रद्धा आहे. पाणी ओसरताच नीलकंठेश्वर महादेव मंदिराचे दर्शन होते. त्यानंतर भाविक पूजा आणि दर्शनासाठी येतात.

मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग आहे. हे मंदिर 500 वर्षांपूर्वी राजपूत शासक राजा चौकाराने बांधले होते. प्रवेशद्वार आणि मंदिरावर भव्य कोरीव काम करण्यात आले आहे. हे मंदिराचे सौंदर्य आणखी वाढवतात.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link