वयाच्या साठीत हवीय 50 हजारहून अधिक पेन्शन, मग सध्या किती रुपये गुंतवायला हवे?

Pravin Dabholkar Thu, 23 May 2024-2:09 pm,

NPS For Senior Citizen: आपण कधी ना कधी वृद्ध होऊ, या सत्याची जाणिव प्रत्येकाला आहे. त्यावेळी काम करण्यास किती सक्षम असू हे माहिती नसल्याने बहुतांशजण तरुणपणीच भविष्याची सोय करुन ठेवतात. समजा आपल्याला वयाच्या साठीनंतर दरमहा 50 हजाराहून अधिक पेन्शन हवी असेल तर? 

नॅशनल पेन्शन स्किम यासाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. एनपीएस ही एक सरकारी योजना असून यामध्ये भरीव योगदान देऊन तुम्ही वृद्धापकाळात दर महिन्याला पेन्शनची व्यवस्था देखील करू शकता. 

यामध्ये टियर 1 आणि टियर 2 अशी दोन प्रकारची खाती आहेत. कोणतीही व्यक्ती टियर 1 खाते उघडू शकते पण  टियर-1 खाते असलेल्या व्यक्तीलाच टियर 2 खाते उघडता येते. 

NPS मध्ये गुंतवलेल्या एकूण रकमेपैकी 60 टक्के रक्कम तुम्ही 60 वर्षांची झाल्यावर एकरकमी घेऊ शकता. तर किमान 40 टक्के रक्कम अ‍ॅन्यूटी म्हणून वापरता येईल. या अ‍ॅन्यूटीतून तुम्हाला पेन्शन मिळते. 

आता हे सर्व वाचून तुम्हालादेखील एनपीएसमध्ये गुंतवणूक करायची इच्छा झालीय का? आता 50 हजारहून अधिक पेन्शन मिळवण्यासाठी दरमहा किती रक्कम गुंतवावी लागेल हे समजून घेऊया. 

समजा तुम्ही वयाच्या 35 व्या वर्षी NPS मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली, तर तुम्हाला या योजनेत 60 वर्षे होईपर्यंत सतत गुंतवणूक करावी लागेल. म्हणजेच तुम्हाला 25 वर्षे योजनेत गुंतवणूक करावी लागेल. 

दर महिन्याला 50 हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला दरमहा किमान 15 हजार रुपये गुंतवावे लागतील. हे गणित आपण NPS कॅल्क्युलेटरनुसार समजून घेऊया.

जर तुम्ही 25 वर्षे सतत दरमहा 15,000 रुपये गुंतवले तर तुमची एकूण गुंतवणूक 45 लाख इतकी  होईल. यावर 10 टक्के व्याजदर पकडला तरी 1 कोटी 55 लाख 68 हजार 356 रुपये व्याज मिळेल. 

अशा प्रकारे तुमच्याकडे एकूण 2  कोटी 68 हजार 356 रुपये असतील. जर तुम्ही या रकमेपैकी 40 टक्के रक्कम वार्षिक म्हणून वापरली, तरी 40 टक्क्यांनुसार तुम्हाला वर्षाला 80 लाख 27 हजार 342 रुपये रक्कम मिळेल. 

तुम्हाला एकरकमी 1 कोटी 20 लाख 41 हजार 014 रुपये इतकी रक्कम मिळेल. वार्षिकी रकमेवर 8% पर्यंत रिटर्न्स मिळाल्यास, दरमहा 53 हजार 516 रुपये इतकी पेन्शन मिळेल.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link