चांगल्या संगोपनासाठी मुलांना `या` सवयी नक्कीच लावा

Pravin Dabholkar Mon, 26 Feb 2024-9:46 pm,

Parenting Tips: कोणतेही मूल हे कच्च्या मडक्याप्रमाणे असते. त्याचे व्यक्तिमत्व घडवण्याची जबाबदारी त्याच्या पालकांची असते. मुलामध्ये कोणते गुण विकसित होतात यात पालकांची मोठी आणि महत्त्वाची भूमिका असते. म्हणूनच मुले त्यांच्या पालकांचा आरसा असतात, असे म्हटले जाते. कारण मुलांमध्ये पालकांच्या संस्कारांची प्रतिमा दिसते. 

अनेकवेळा लहान मुले असे काही करतात किंवा असे काहीतरी करतात ज्याचा सर्वांना अभिमान वाटतो. याचे कारण त्यांच्या पालकांनी त्यांना असे चांगले संस्कार दिले आहेत. मुले भविष्यात चांगले नागरिक बनतील आणि मोठ्यांचा आणि लहानांचा आदर करतील,  अशा सवयी मुलांना लहानपणापासूनच शिकवल्या पाहिजेत.  मुलांना शिकवायला हव्यात अशा चांगल्या सवयींबद्दल जाणून घेऊया.

मुलांची सर्वात चांगली सवय म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे. कोणत्याही नातेवाईकाने केलेल्या लहानसहान उपकारांची प्रशंसा करायला शिकवावे.  त्या बदल्यात आभार किंवा कृतज्ञता व्यक्त करायला शिकवावे. मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी पालकांनी कृतज्ञ राहावे, हा गुण मुलांमध्येही हळुहळू उतरतो. 

एखाद्या व्यक्तीसाठी सहानुभूती आणि काळजी घेणे हे चांगल्या मुलांचे वैशिष्ट्य आहे. काहीजण आपल्याला मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात. अशावेळी त्यांच्या मदतीचे कौतुक करायला हवे. यामुळे इतरांना मदत करण्याची मुलांची भावना आणखी दृढ होईल.

मुलांनी स्वतःचे विचार सर्वांसमोर मांडणे हे कौशल्याचे लक्षण आहे. आपल्या मनातील भावना सर्वांसमोर उघडपणे मांडता याव्यात यासाठी पालकांनी मुलांना मदत करावी. असे असताना या काळात तुम्ही त्यांचे मत बदलणार नाही याची काळजी घ्या. पण काही चुकत असेल तर नक्कीच सुधारणा करा.

मुलांना त्यांच्या जबाबदाऱ्या समजवायला हव्यात. मोठे झाल्यावर आपल्याला काहीतरी करायचे आहे. आपल्याला लहान भाऊ-बहिणींना सांभाळून घ्यायचंय. त्यांच्यासाठी आदर्श बनायचे आहे, हे मुलांना तुमच्या वागण्या बोलण्यातून समजायसा हवे.

मुलांना दिलेल्या वेळेत त्यांचे काम पूर्ण करतात का याकडे लक्ष द्यावे. वेळ मौल्यवान आहे आणि तो वाया घालवू नये याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे.

मुलांमध्ये मानवाप्रती किंवा प्राणी यांच्याबद्दलही करुणेची भावना असावी. ती वाढवण्यासाठी पालकांनी प्रयत्न करावेत. 

मुलांना  काहीतरी खायला हवं असेल तेव्हा त्यांनी दुसऱ्याकडून हिसकावून घ्यायला नको. त्यांना मिळेपर्यंत धीर धरायला शिकवायला हवे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link