2 Olympics मेडल जिंकणाऱ्या मनू भाकरच्या ट्रेनिंगवर मोदी सरकारने किती खर्च केला?

Swapnil Ghangale Tue, 30 Jul 2024-2:58 pm,

भारतीय नेमबाज मनु भाकर आणि सरबजोत यांनी सांघिक खेळामध्ये पदक मिळावलं आहे. भारताचं हे पॅरिस ऑलम्पिक 2024 मधील दुसरं पदक ठरलं आहे.

 

मनु आणि सरबजोतच्या जोडीनं 10 मीटर एअर रायफल मिश्र प्रकारामध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिलं आहे. 

 

विशेष म्हणजे या पदकासहीत मनु ही भारतासाठी एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी पहिलीच खेळाडू ठरली आहे. 

 

यापूर्वी मनुने 28 जुलै रोजी 10 मीटर एअर रायफल या प्रकारामध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. 

कोणत्याही नेमबाजीच्या स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकणारी मनु ही पहिलीच महिला खेळाडू ठरली होती.

मात्र भारतासाठी दोन पदकं जिंकणाऱ्या मनुच्या ट्रेनिंगसाठी भारत सरकारने किती पैसा खर्च केला आहे तुम्हाला ठाऊक आहे का? याचा खुलासा सरकारनेच केला आहे.

मनुने इंडिव्ह्यूअल स्पर्धेमध्ये पहिलं कांस्य पदक पटकावल्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मंडाविया यांनी मनुच्या प्रशिक्षणावरील सरकारी खर्चाची माहिती दिलेली.

 

मनुच्या प्रशिक्षणासाठी सरकारने 2 कोटी रुपये खर्च केले आहेत, असं  केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितलं.

मनुला प्रशिक्षणासाठी जर्मनी आणि स्वित्झर्लंडला पाठवण्यात आलं होतं. तसेच तिला मनासारखा प्रशिक्षक नियुक्त करता यावा म्हणून सरकारने अर्थसहाय्य केलं होतं असं केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मंडाविया म्हणाले.

प्रत्येक खेळाडूसाठी अशी इको सिस्टीम तयार करुन त्यांना आर्थिक मदत करण्याचं सरकारचं धोरण असून या माध्यमातून राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी उत्तम कामगिरी करावी यासाठी ही मदत केली जाते, असंही केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी सांगितलेलं. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link