Shubhash Chandra Bose Quotes: नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त वाचा त्यांचे प्रेरणादायी विचार, अंगावर उभा राहील रोमांच

दक्षता ठसाळे-घोसाळकर Tue, 23 Jan 2024-11:41 am,

'तुम मुझे खून दो,मै तुम्हे आझादी दूंगा' या वाक्याने स्वातंत्र्याच्या शोधात असलेल्या लाखो तरुणांना संघर्षाची प्रेरणा मिळाली.

जर संघर्ष नसेल तर तुमचे आयुष्याचे अर्धे स्वारस्य गमावते.

मला हे माहित नाही की स्वातंत्र्याच्या या लढाईत आपल्यापैकी कोण जगेल. पण मला हे माहिती आहे की, शेवटी विजय आपलाच होणार आहे.

निर्विवाद राष्ट्रवाद, संपूर्ण न्याय आणि निष्पक्षतेच्या आधारेच भारतीय मुक्ती सेनेचे निर्माण केले जाऊ शकते.

एखादा माणूस एखाद्या विचारासाठी मरतो, पण तो विचार त्याच्या मृत्यूनंतर हजारो आयुष्यांमध्ये उतरतो.

“आईचे प्रेम सर्वात खोल आहे! निःस्वार्थ! ते कोणत्याही प्रकारे मोजले जाऊ शकत नाही!”

अन्यायाशी तडजोड करणे हे सर्वात मोठे पाप आहे.

आमच्या सार्वत्रिक जीवनाचा आदर्शभूत पाया न्याय, समता, स्वातंत्र्य, शिस्त आणि प्रेम हा असावा.

कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद आहे, जे दुसऱ्यासाठी झटतात त्यांनाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो.

जाती संस्थेचे निर्मुलन करा, जातीभेद, धर्मभेद यांना काहीही अर्थ नाही.

जीवन म्हणजे सुखद शय्या नसून एक समरभूमी आहे.

डोळ्यात आशेचे स्वप्न, हातात मृत्यूचे फुल आणि अंत:करणात स्वातंत्र्याचे वादळ हाच खरा क्रांतिकारकाचा बाणा आहे.

तात्पुरत्या पराभवाने दाबून खचून जाऊ नका.

 

तुमची प्रेरणा, तुमची चेतना साजिवंत ठेवा.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link