परदेशातील नाही हे Photos भारतातील आहेत! मोदींनी शेअर केला `या` Airport चा नवा लूक

Fri, 07 Apr 2023-12:56 pm,

चेन्नई विमानतळावरील नव्या टर्मिनसचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शनिवारी पार पडणार आहे.

या इमारतीचे काही फोटो पंतप्रधान मोदींनी फेसबुकवरुन शेअर केले आहेत. ही नवीन इमारत फारच अद्यावत असल्याचं सांगितलं जात आहे.

या नव्या विमानतळाचा एकूण एरिया तब्बल 2 लाख 20 हजार 972 स्वेअर मिटर इतका आहे.

भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे विमानतळ असल्याचंही सरकारने म्हटलं आहे.

चेन्नई विमानतळाच्या टर्मिनल बिल्डींगमधील या इमारतीचं उद्घटान आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 8 एप्रिल रोजी होणार आहे.

दरवर्षी या विमानतळावरील सेवांचा लाभ 3 कोटी 50 लाख प्रवाशांना घेता येणार आहे, असं सरकारचं म्हणणं आहे.

 

तामिळनाडूमधील वाढत्या परदेशी प्रवाशांना हाताळण्यासाठी हे नवीन विमानतळ फार महत्त्वाचं ठरणार आहे, असं भारत सरकारच्या विमान प्राधिकरण विभागाने म्हटलं आहे. 

या विमानतळ इमारतीमुळे येथे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल अशी अपेक्षा पंतप्रधान मोदींनी फेसबुकवर शेअर करताना व्यक्त केली आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link