Raksha Bandhan 2023 : भावासाठी अशी राखी असते अशुभ! उत्साहाच्या भरात खरेदी करताना घ्या काळजी

Wed, 16 Aug 2023-11:36 am,

बाहेरगावी असणाऱ्या भावाला राखी पाठवण्यासाठी बहिणींची राखी खरेदीची लगबग दिसून येते आहे. राखी खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. नाही तर शुभ ऐवजी अशुभ फळ मिळेल असं ज्योतिषशास्त्र पंडीत सांगतात. 

फॅशन राखी घेताना अशुभ गोष्टींची खरेदी करु नका. काळ्या धाग्याची किंवा काळ्या रंगाची राखी कधीही घेऊ नका. काळा रंग हा नकारात्मकतेचे प्रतीक असतं. 

 

लहान मुलांसाठी कार्टूनची राखी बाजारात मिळते. या राख्या अजिबात खरेदी करु नका. या राख्यांवर कधी-कधी क्रॉस, हाफ वर्तुळ असतात ते अशुभ मानलं जातं. याचा परिणाम भावाच्या आयुष्यावर होतो. राख्या घेताना त्यावर बनवलेल्या चिन्ह बघून त्याची खरेदी करा. 

प्रतिमा रक्षा सूत्र म्हणजेच मॉली ही सर्वात शुद्ध आणि पवित्र राखी असते. यासोबतच फुलं आणि मोत्यांनी बनवलेली राखी भावासाठी शुभ असते. 

भावाच्या मनगटावर देवी-देवतांचे चित्र असलेली राखीही बांधू नये. अनेकवेळा राखी तुटून पडते किंवा नकळत घाणेरडे हात असतात. अशावेळी देवांचा अपमान होतो. 

राखी घेताना त्या तुटलेल्या किंवा त्या बांधताना तुटतील अशा घेऊ नयेत. कारण त्या अशुभ असतात. 

तुमच्या घरात जुनी राखी पडली असेल तर ती फेकून देऊ नका. ती वाहत्या नदीत किंवा तलावात विसर्जित करा.

 मिठाईमध्येही काळा आणि तपकिरी रंग टाळावा. चॉकलेटसोबतच लाडू, दूध बर्फी, केशर बर्फी, स्पंज, रसमलाई यासारखे गोड पदार्थ तुम्ही घेऊ शकता. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link