अन रणबीर कपूरच्या हातात हात देत दीपिका पादुकोण रॅम्पवर अवतरली

Sat, 21 Apr 2018-11:06 am,

मिजवान वेल्फेयर सोसायटीद्वारा आयोजित या शोमध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.  अभिनेत्री शबाना आझमीद्वारा संचलित या वार्षिक शोअम्ध्ये वहिदा रेहमान,आशा पारेख,नंदिता दास, जावेद अख्तर, हुमा कुरेशी, नुशरत भरूचा, यामी गौतम, मौनी रायसह अनेक कलाकार होते.

 या शोमध्ये सादर करण्यात आलेल्या सार्‍याच कपड्यांवर खास 'चिकनकाम' पाहण्यात आलं. 

 रणबीरने काळ्या रंगाची शेरवानी तर त्याला साजेसा पांढर्‍या रंगाचा खास नाजूक नक्षीकाम केलेला लेहंगा दीपिका पादुकोणने परिधान केला होता. 

सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या खास ड्रेससाठी रणबीर कपूर आणि दीपिका पादूकोण हे दोघे शो स्टॉपर होते. 

 'द वॉक ऑफ मिजवान' या शो साठी रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण ही जोडी रॅम्पवर एकत्र उतरली होती.  

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link