`चला हवा येऊ द्या`च्या मंचावर अवतरणार `सिम्बा`

Dakshata Thasale Sat, 22 Dec 2018-2:35 pm,

आपला रोजचा ताणतणाव विसरून आपल्याला हसायला लावणारी, अनेक सेलिब्रिटींच्या उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन करणारी मालिका म्हणजे 'चला हवा येऊ द्या

 अवघ्या काही दिवसातच हा कार्यक्रम लोकप्रिय ठरला आणि त्यातील कलाकार महाराष्ट्रातील नव्हे तर परदेशातीलही रसिकांच्या मनावर राज्य करत आहेत

४०० भागांचा यशस्वी टप्पा पार पडल्यावर या चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल हे नवे पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे ज्यात तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला आहे.

मराठीच नव्हे तर आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, रितेश देशमुख, इरफान खान, जॉन अब्राहम, रविना, नाना पाटेकर, विद्या बालन यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील या मंचावर हजेरी लावली. 

आता ‘सिम्बा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता रणवीर सिंग लवकरच झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमात येणार आहे.

आता हे कलाकार थुकरट वाडीत सज्ज होणार म्हटल्यावर विनोदवीरांनीदेखील धमाल केली. थुकरट वाडीत चेन्नई एक्सप्रेस आणि सिंघम या चित्रपटांवर आधारित विनोदी स्किट सादर करण्यात आलं. या धमाकेदार स्किटने सर्व कलाकारांना पोट धरून हसायला लावलं. 

आता हे कलाकार थुकरट वाडीत सज्ज होणार म्हटल्यावर विनोदवीरांनीदेखील धमाल केली. थुकरट वाडीत चेन्नई एक्सप्रेस आणि सिंघम या चित्रपटांवर आधारित विनोदी स्किट सादर करण्यात आलं. या धमाकेदार स्किटने सर्व कलाकारांना पोट धरून हसायला लावलं. 

इतकंच नव्हे तर दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना त्यांचं हे स्किट इतकं आवडलं की रोहितने सगळ्यांचं तोंडभरून कौतुक तर केलंच पण त्याच सोबत त्याने निलेशकडे या स्किटचे राईट्स मागितले आणि त्या स्किटवर चित्रपट बनवायला आवडेल असं हि म्हणाला.

तेव्हा सिम्बा चित्रपटाच्या टीमसोबत विनोदवीरांनी केलेली हि धमाल पाहायला विसरू नका चला हवा येऊ द्या मध्ये २४ आणि २५ डिसेंबर सोमवार व मंगळवार रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर!!!

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link