मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात घरांची विक्री वाढली, आकडेवारी आली समोर

Pravin Dabholkar Sun, 31 Mar 2024-6:55 am,

Real Estate: मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातून घरांच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात आकडेवारी समोर आली असून   मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह देशातील 9 प्रमुख शहरांमध्ये घराच्या विक्रीमध्ये कमालाची वाढ दिसून आली आहे. नवीन पुरवठ्याच्या तुलनेत जास्त विक्रीमुळे, गेल्या तीन महिन्यांत देशातील 9 प्रमुख शहरांमध्ये न विकल्या गेलेल्या घरांची संख्या 7 टक्क्यांनी घटून सुमारे 4.81 लाख युनिट्सवर आली आहे.

रिअल इस्टेट क्षेत्रात दिवसेंदिवस वेगाने बदल घडत आहेत. या क्षेत्रातील डेटाचे विश्लेषण करणारी कंपनी PropEquity ने आपल्या अहवालातून महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहिती नुसार, या वर्षी मार्च अखेर 9 प्रमुख शहरांमध्ये न विकल्या गेलेल्या घरांची संख्या 4 लाख 81 हजार 566 होती. डिसेंबर 2023 अखेर हा आकडा 5 लाख 18 हजार 868 युनिट होता.

या 9 शहरांमध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, दिल्ली-एनसीआर (दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद आणि फरिदाबाद), बेंगळुरू, हैदराबाद, पुणे, चेन्नई आणि कोलकाता यांचा समावेश होतो. 

लोकांनी नवीन घरे घेण्यापेक्षा न विक्री झालेली घरे घेण्यास प्राधान्य दिल्याचे या आकडेवारीतून समोर आले, असे प्रोपइक्विटीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) समीर जासुजा यांनी सांगितले. देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये घरांची जास्त मागणी असूनही, जानेवारी-मार्चमध्ये निवासी मालमत्तांच्या नवीन युनिट्सचा पुरवठा 15% कमी झाला. त्यानंतर ही आकडेवारी 69 हजार 143 युनिट्सवर आली.

आठ प्रमुख शहरांमधील प्राथमिक (प्रथम विक्री) नवीन निवासी मालमत्तांच्या पुरवठ्याशी संबंधित डेटा जारी करण्यात आला. त्यातील आकडेवारीनुसार, बेंगळुरू आणि मुंबईमध्ये नवीन घरांची मागणी वाढली आहे. रिअल इस्टेट सल्लागार कुशमन आणि वेकफिल्ड यांनी ही माहिती दिली.

असे असले तरी दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR), चेन्नई, हैदराबाद, पुणे, कोलकाता आणि अहमदाबादमध्ये या डेटात घट झाली आहे. या क्षेत्रात घरे विकत घेण्यास लोकांनी कमी स्वारस्य दाखवले आहे. तिमाहीत एकूण निवासी मालमत्तांची संख्येत (जानेवारी-मार्च) )  'हाय-एंड आणि लक्झरी' विभागाचा वाटा 34 टक्के होता.

गेल्या एका वर्षात 'हाय-एंड आणि लक्झरी' मालमत्तांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. लोकांची लाईफस्टाईल बदलली आहे. याचा परिणाम रियल इस्टेटवर दिसतोय. उच्च प्रतीचे लोकेशन आणि घर घेण्याकडे लोकांचा कल आहे. 

उच्च-गुणवत्तेच्या मालमत्तेत गुंतवणूक वाढणे याचा अर्थ घर खरेदीदारांची वाढती इच्छा आणि त्यांच्या जीवनशैलीतील आकांक्षा दिसून येत असल्याचे कुशमन आणि वेकफिल्डचे व्यवस्थापकीय संचालक (निवासी सेवा) शालीन रैना यांनी सांगितले.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link