प्रमोशनल पोस्टरवर लीक झाली Samsung Galaxy Note 9 ची किंमत

Mon, 30 Jul 2018-7:57 pm,

लेटेस्ट फ्लॅगशिप फॅबलेट गॅलेक्सी नोट-9 ला सॅमसंग 9 ऑगस्ट रोजी  लॉन्च करणार आहेत. मात्र लॉन्च पूर्वीच या मोबाईलची किंमत लीक झाली आहे.  इंडोनेशियामधील एका प्री-ऑर्डर पोस्टरमध्ये फोनच्या किंंमतीचे संकेत मिळाले आहेत. 

गॅलेक्सी नोट 9 च्या बेस वेरियंट मध्ये 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. त्याची किंमत 13,500,000 इंडोनेशिआई रुपये  (सुमारे 64,400 रुपए) असेल. तर दूसरा वेरियंट  17,600,000 इंडोनेशियाई रुपये (सुमारे 83,500 रुपए) मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. 

किंमतीप्रमाणेच पोस्टरमध्ये नोट 9 च्या कलर वेरियंट्स बाबतही माहिती मिळाली आहे. बेस वेरियंट  मिस्टिक ब्लैक, इंजीनियर्ड ब्लू  आणि आर्टिशन कॉपर कलर मध्ये असू शकतो. तर 512 जीबी वेरियंट मिस्टिक ब्लू आणि इंजीनियर्ड ब्लू रंगात असण्याची शक्यता आहे. 

सॅमसंग पोलंडच्या माहितीनुसार, सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 हा 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज सोबत 990 यूरो (सुमारे 79,000 रुपए) मध्ये लॉन्च करण्यात येईल.  यूरोपीय यूनियनमध्ये लागणारा 20 % टॅक्सही यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या फोनची किंमत अमेरिकेत 960 डॉलर (सुमारे 65,778 रुपए) असू शकते. 

 अमेरिका आणि चीनमध्ये लॉन्च होणार्‍या गॅलेक्सी नोट 9 मध्ये क्वालकॉम स्नैपड्रैगन 845 प्रोसेसर देण्यात आला आहे. इतर ठिकाणी कंपनीच्या एक्सीनॉस प्रोसेसर सोबत दाखल केले जाणार आहे.  कंपनीच्या डिव्हाईसला 6 व 8 जीबी रॅम मध्ये लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे. 

फोनमध्ये 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज असण्याची शक्यता आहे. हे माइक्रोएसडी कार्डला सपॉर्ट करेल. फोनमध्ये 6.4 इंच डिस्प्ले असेल. हैंडसेट मध्ये ISOCELL टेक्नोलॉजी सोबत ड्यूल रियर कॅमेरा सेटअप आणि 4000 एमएएच बॅटरी सोबत ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन असण्याची शक्यता आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link