साताऱ्यातील श्री जितोबा बगाड यात्रेत गुलालाची उधळण; पाहा भारावणारे क्षण

Fri, 03 May 2024-2:29 pm,

जत्रा म्हटलं की, गावखेड्यांपासून अगदी शहरी भागांपर्यंत असणारा कल्ला, गर्दी, एखाद्या देवतेच्या नावानं होणारा गजर असंच एकंदर चित्र पाहायला मिळतं. 

 

महाराष्ट्रात जत्रा, यात्रांच्या याच वलयामध्ये बगाड यात्रा विशेष गाजतात. तुम्ही बावधनच्या बगाड यात्रेविषयी ऐकलच असेल. अशीच एक यात्रा नुकतीच साताऱ्याच पार पडली. 

साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील जिंती येथे प्रसिद्ध असलेली श्री जितोबा बगाड यात्रा उत्साहत पार पडली झाली. नीरा नदीच्या काठावर सुख-समृद्धीने नटलेले सुंदर असलेले जिंती गावातील बारा बलुतेदार समाजातील लोकांच्या माध्यमातून बगाड यात्रा संपन्न होत असते. 

गेल्या 350 वर्षांपासून इथं ही यात्रा भरत असते. जिल्ह्यासह राज्यतील नागरिक श्री जितोबा बगाड यात्रेसाठी जिंती येथे येत असतात. जितोबा नावाने जायघोष, चांगभलं करत बगाडाचा थरार इथं पाहायला मिळत असतो.  

 

हराळी वैष्णव समाजातील मठात बगाड्याचा मानकर याचा गावाच्या वतीने पोशाख परिधान केला जातो. पोशाख झाल्यानंतर वाजत गाजत जितोबाच्या नावानं चांगभले बोला जयघोष करत बगाड्याच्या मानकऱ्याला श्री.जितोबा मंदिरातून दर्शनासाठी घेऊन जातात. 

 

बगाडला भावी भक्त नवसाचे नारळाचे तोरण पैसे बांधले जातात हजारो भाविक नवस फेडण्यासाठी येत असतात. विशेष म्हणजे हा बगाडाचा मान हरळी वैष्णव समाज यांना गेल्या 350 वर्षांपासून आहे.

 

महाराष्ट्रात विविध गावांमध्ये विविध पद्धतींनी बगाड यात्रा पार पडते. जितोबा यात्रा त्यातीलच एक. अशा या महाराष्ट्राच्या बगाड यात्रेला सिनेजगतातही स्थान मिळालं आहे. काही आठवतंय का? 

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link