Sawan Purnima 2023 : श्रावण पौर्णिमेला `या` 5 पैकी एकही वस्तू घरी आणा, नशीब चमकेल!

Wed, 30 Aug 2023-7:27 am,

श्रावण पौर्णिमेला शनि आणि गुरु वक्री होणार आहे. तर रवियोग आणि बुधादित्य हे शुभ योगदेखील जुळून आले आहेत. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमला घरात सुख समृद्धी आणि वैवाहिक जीवनात सकारात्मक परिणामासाठी उपाय सांगितले आहेत.

ही पौर्णिमा अतिशय खास असून तब्बल 200 वर्षांनंतर अद्भुत योगायोग निर्माण झाला आहे. अशात 5 पैकी एकही वस्तू घरी आणली तर तुमचं नशीब चमकणार असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

स्वस्तिक हे हिंदू धर्मात एक अतिशय शुभ चिन्ह मानलं जातं. पूजा आणि यज्ञ या विधीमध्ये स्वस्तिकचं प्रतीक काढण्याची परंपरा आहे. त्याशिवाय घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक काढला जातो. श्रावणात पौर्णिमेच्या दिवशी घराच्या उंबरठ्यावर चांदीचं स्वस्तिक लावल्यास घरात सुख-समृद्धी नांदते.

श्रावण पौर्णिमेच्या दिवशी घरी एकाक्षी नारळ आणल्यास देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते अशी मान्यता आहे. 

माता लक्ष्मीला पलाशचे फूल अतिशय प्रिय असते असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी घरात पलाशचं झाडं लावल्यास आर्थिक स्थिती चांगली होते. 

हिंदू धर्मात सोने खरेदी करणं खूप शुभ मानले जाते. त्यामुळे पौर्णिमेला घरात समृद्धीची वाढ कऱण्यासाठी सोनं खरेदी करावे असं सांगण्यात आलं आहे. 

सोने घेता आलं नाही तर चांदीही घेता येते. त्यामुळे माता लक्ष्मीचा आशिर्वाद तुमच्या घरावर कायम राहतो. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link