मोठ्या पडद्यावरचे `समलैंगिक संबंध`

Thu, 06 Sep 2018-2:55 pm,

कोर्टानं हा निर्णय आज दिला असला तरी जवळपास 20 वर्षांपूर्वी अर्थात 1998 साली दिग्दर्शक दीपा मेहता यांनी समलैंगिकतेवर आधारित 'फायर' सिनेमा हा सिनेमा प्रेक्षकांसमोर आणला होता. परंतु, दोन स्त्रियांच्या संबंधांवर आधारित असलेला हा सिनेमा समाजाला रुचला नव्हता. भारतीय सभ्यतेला धक्का लावणारा सिनेमा असल्याचं सांगत याचा विरोध करण्यात आला... सिनेमा बॅन करण्यात आला... सिनेमागृहांत तोडफोड करण्यात आली... इतकंच नाही तर या सिनेमात मुख्य भूमिका निभावणाऱ्या शबाना आझमी आणि नंदिता दास यांना जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या. 

गे कपलवर आधारित या सिनेमात संजय सुरीनं मुख्य भूमिका निभावली होती. हा सिनेमा समलैंगिकतेशिवाय एचआयव्ही एडसच्या मुद्यावरही आधारलेला होता. 2005 मध्ये आलेल्या या सिनेमात अभिनेत्री जुही चावलानं संजयच्या बहिणीची भूमिका निभावली होती.

याच मुद्यावर बनवण्यात आलेल्या 'अनफ्रीडम' या सिनेमावर भारतात बंदी आणण्यात आली होती. 2014 मध्ये आलेल्या या सिनेमात दोन मुलींचे संबंध दर्शवण्यात आले होते. हा सिनेमा नेट फ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आलेत.

बॉलिवूडचा अत्यंत नावाजलेला अभिनेता मनोज वाजपेयीनं 'अलीगढ' सिनेमात एका गे व्यक्तीची भूमिका साकारत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. अलीगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर रामचंद्र यांच्या आयुष्यावर आधारित या सिनेमावर वादही झाला होता. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. 

आय एम या सिनेमातही अभिनेता राहुल बोसनं महत्त्वाची भूमिका निभावलीय. या सिनेमात समलैंगिकांची मानसिक स्थिती समजावण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. 

मल्टीअॅक्टर सिनेमा 'कपूर अॅन्ड सन्स'मध्येही समलैंगिकांच्या अधिकारांबाबत भाष्य करण्यात आलंय. या सिनेमात पाकिस्तानी अभिनेता फवाद खाननं गे व्यक्तीची भूमिका निभावलीय. 

बॉलिवूडच्या चार प्रसिद्ध दिग्दर्शकांनी एकत्र येऊन 2013 साली 'बॉम्बे टॉकीज' नावाचा एक सिनेमा बनवला होता. अभिनेता रणदीप हुडा आणि शाकिब सलीमनं या सिनेमात गे कपलची भूमिका साकारलीय.

फॅशन इंडस्ट्रीवर आधारित प्रियांका चोपडा हिचा सिनेमा 'फॅशन'मध्येही डिझायनर बनलेल्या समीर सोनीनं एका गे व्यक्तीची भूमिका निभावलीय. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link