ZERO च्या सेटवर शाहरूखने केलं अनुष्काचं `खास` अंदाजात स्वागत

Tue, 09 Jan 2018-8:36 am,

११ डिसेंबरला विरूष्काने लग्न  केल्यानंतर, दिल्ली आणि मुंबईत ग्रॅन्ड रिसेप्शन आयोजित केलं होतं. त्यानंतर नववर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी अनुष्का विराटसह दक्षिण आफ्रिकेत पोहचली होती. 

लग्न, रिसेप्शन, दक्षिण आफ्रिकेत नवं वर्षाचं स्वागत केल्यानंतर आता अनुष्काने पुन्हा  कामावर लक्ष केंद्रीत केले आहे.  

 ZERO  च्या सेट्सवर अनुष्काचं स्वागत करण्यासाठी शाहरूख खान आणि टीमने तिला खास फूलांंची भेट दिली. अनुष्काने या गिफ्टचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

रविवारी रात्री अनुष्का मुंबईमध्ये परतली आहे. विरूष्काच्या ग्रॅन्ड रिसेप्शननंतर अनुष्का विराट कोहली आणि भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिकेला गेली होती. 

विराटसोबत दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर असणारी अनुष्का भारतामध्ये परतली आहे. अनुष्काने कामालाही सुरूवात केली 

लवकरच वरूण धवन सोबत सुईधागा चित्रपटाचेदेखील शुटिंग सुरू होणार आहे.  (फोटो साभार-  ट्विटर /इंस्टाग्राम )

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link