Shani Mahadasha : 2 वर्षे 6 महिन्यांची शनी महादशा देईल बक्कळ पैसा, कधी येणार हा सुखद काळ?

Mon, 26 Jun 2023-3:21 pm,

कुंडलीत शनीची महादशा ही 19 वर्षे असते. ज्याचा जाचकाच्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम दिसून येतो. 

 

शनीच्या महादशामध्ये 9 ग्रहांचं उपकाल असतात. म्हणजेच महादशामध्ये नऊ ग्रहांच्या अंतर्दशेचा काय परिणाम होतो ते आज आपण पाहूयात. 

 

शनीच्या महादशामध्ये शुक्राची अंतर्दशा 3 वर्षे 2 महिने इतकी असते. शनीच्या महादशामध्ये जेव्हा शुक्र अंतर्दशामध्ये असतो तेव्हा त्या व्यक्तीचे जीवन सुधारते. बिघडणारे कामही बनू लागते. वैवाहिक जीवनात आनंदाची सुरुवात होते. करिअरमध्ये तुम्ही उंच शिखर गाठता. 

शनीच्या महादशामध्ये सूर्याची अंतर्दशा ही 11 महिने 12 दिवसांची असते. सूर्य आणि शनी हे एकमेकांचे शत्रू आहे असं ज्योतिषशास्त्रात म्हटलं जातं. त्यामुळे शनीच्या महादशामध्ये सूर्याचा अंतर्दशाही ही अशुभ मानली जाते. या काळात जाचकाच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होतात. त्यांना आजाराने घेरलं जातं. कुटुंबात वादावादी होते त्यामुळे घरातील शांतता भंग होते. 

शनीच्या महादशामध्ये चंद्राची अंतर्दशा 1 वर्षे 7 महिने असते. या काळामध्ये जाचकाला अनेक त्रासाला सामोरे जावं लागतं. आरोग्याची समस्यासोबत वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होतो. आर्थिक फटका बसतो. 

शनीच्या महादशामध्ये मंगळाची अंतरदशा 1 वर्ष, 9 महिने आणि 9 दिवस टिकते. या दरम्यान व्यक्तीच्या स्वभावात अनेक बदल दिसून येतात. त्या व्यक्तीला अधिक राग येऊ लागतो. तो आक्रमक होतो, त्यामुळे वैवाहिक जीवनातून आनंद निघून जातो.

शनीच्या महादशामध्ये बुध ग्रहाची अंतर्दशा 2 वर्षे 8 महिने आणि 9 दिवस असते. या दिवसांमध्ये जाचकाची कार्यक्षेत्रात प्रगती होते. प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश प्राप्त होतं. समाजात त्यांचं नाव गाजतं. 

 

शनीच्या महादशामध्ये गुरूची अंतर्दशा ही 2 वर्षे 6 महिने आणि 12 दिवसांची असते. या काळात व्यक्तीची धार्मिक कार्यात रुची अधिक वाढते. त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळायला लागतं. घरात आनंदच आनंद असल्याने मन प्रसन्न राहतं. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.) 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link