Shiv Jayanti 2024 : रयतेचा राजा... छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, शेअर करा WhatsApp, HD Image, Status फोटो

दक्षता ठसाळे-घोसाळकर Mon, 19 Feb 2024-12:48 pm,

गर्व आहे शेंदूर गुलालाचा, गर्व आहे त्या बेधुंद तुतारीचा, गर्व आहे विठोबा-माऊलीचा, अन गर्व आहे महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराजाच्या.

वाघाची जात कधी थकणार नाही, शत्रूंच्या समोर कधी झुकणार नाही, शपथ आहे आम्हाला या मातीची मरे पर्यंत जय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही.

आयुष्य छान आहे, थोड लहान आहे परंतु, छत्रपती शिवरायांच्या मातृभुमी वर जन्माला आलो याचाच मला अभिमान आहे.

माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय धन्य धन्य माझे शिवराय !! जय जिजाऊ जय शिवराय !! !! जय शंभूराय !!

नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी। नमो धर्मभूमी जिच्या कामी, पडो देह माझा सदा ती नमामी ।।

सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला.

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे, राजा शिवछत्रपती.

जगणारे ते मावळे होते, जागवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेनं काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता फक्त माझा शिवबा होता!!

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link