PHOTOS: दांडपट्टा राज्यशस्त्र म्हणून घोषित करणार, महाराष्ट्र पहिलं राज्य ठरणार

Mon, 19 Feb 2024-4:51 pm,

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळ्यांनी अनेक लढायांमध्ये वापरलेल्या दांडपट्टा या शस्त्रास महाराष्ट्राचं राज्यशस्त्र म्हणून घोषित केलं जाणार आहे. 

आग्रा इथं होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना दांडपट्ट्याचा अध्यादेश सुपूर्द केला जाणार आहे, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. 

राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्याभिषेत सोहळा आणि शिवजयंती साजरी केली जात आहे. याचं औचित्य साधून हा निर्णय घेण्यात आल्याचं सुधीर मुनगंटीवर यांनी सांगितलं.

दांडपट्टा हे शस्त्र महाराष्टातील जनेतच्या चिरंतन स्मृतीत राहावे हा उद्देश असल्याचंही सुधीर मुनगंटीवर यांनी सांगितलं. प्राचीन काळात दांडपट्ट्याचा उल्लेख ‘पट्टीश’ असा केला जात होता.

छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख असणाऱ्या शिवभारत, सभासद बखर आणि राज्यव्यवहार कोष, तसंच अनेक बखरी आणि ऐतिहासिक साहित्यात दांडपट्टा शस्त्राचा उल्लेख आढळतो. 

दांडपट्टा हे तलवारीच्या पात्यासारखं एक शस्त्र आहे. यात लांबलचक, सरळसोट आकाराचे, पोलादापासून बनवलेले पाते आणि मुठीवर चढवता येणारे चिलखत जोडलेलं असतं. 

मराठ्यांच्या पायदळाने अनेक युद्धमोहिमांत दांडपट्टा या शस्त्राचा परिणामकारक वापर केल्याचा उल्लेख सापडतो. दांडपट्ट्याला राज्यशस्त्र जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link