शिवरायांना कशी मिळाली `छत्रपती` उपाधी? वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

Pravin Dabholkar Mon, 19 Feb 2024-12:00 pm,

Shiv Jayanti 2024: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि मराठा साम्राज्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार आज 19 फेब्रुवारी 2024 रोजी 394 वी जयंती साजरी केली जात आहे.  छत्रपती शिवरायांचा पराक्रम आज साडे चारशे वर्षानंतरही आठवला जातो. सुर्य, चंद्र असेपर्यंत भारतभूमीवर छत्रपती शिवरायांचे नाव घेतले जाईल, असे सांगितले जाते. 

आपल्याला शाळेपासून शिवरायांचा इतिहास शिकवला जातो. बाल शिवाजी ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रवास समजून घेण्यासाठी अनेक ग्रंथ कमी पडतील. आपण काही मुद्द्यांमध्ये थोडक्यात समजण्याचा प्रयत्न करुया.

शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ला, पुणे, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव शिवाजी राजे भोंसले. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी आणि आईचे नाव जिजाबाई होते. आपल्या आईच्या धार्मिक गुणांचा शिवरायांवर खूप प्रभाव होता.

शिवरायांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच झाले. त्यांना धार्मिक, राजकीय आणि युद्धकलेचे शिक्षण देण्यात आले. आई जिजाबाईंनी त्यांना महाभारत, रामायण आणि इतर प्राचीन भारतीय ग्रंथांची शिकवण दिली.

शिवरायांनी राजकारण आणि युद्धनीती बालपणीच आत्मसात केली. त्यांचे बालपण राजा राम, गोपाळ, संत आणि रामायण, महाभारतातील कथा आणि सत्संगात गेले. ते सर्व कलांमध्ये पारंगत होते.

शिवरायांचा पहिला विवाह 14 मे 1640 रोजी सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला. तेव्हा शिवाजी 10 वर्षांचे होते. सईबाईंपासूनपासून शिवरायांना 4 मुले झाली. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव सोयराबाई मोहिते होते. शिवरायांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी हे गादीवर आले.

छत्रपती शिवरायांना अनेक पदव्यांनी गौरवण्यात आले. दरम्यान त्यांना छत्रपती पदवी कधी मिळाली याबद्दल जाणून घेऊया. 6 जून 1674 रोजी रायगड येथे मराठ्यांचा राज्याभिषेक झाला.  छत्रपती, क्षत्रियकुलवंत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत अशा अनेक पदव्या त्यांच्या शौर्यामुळे देण्यात आल्या होत्या.

विजापूरचा बादशाह आदिलशहाने छत्रपती शिवरायांना अटक करण्याचा कट केला. पण यातून ते निसटले. पण त्यांचे वडील शहाजी भोसले यांना आदिलशहाने कैद केले. छत्रपतींनी हल्ला करून प्रथम वडिलांची सुटका केली. नंतर पुरंदर, जावळी हे किल्लेही ताब्यात घेतले.

त्यांनी मुघलांविरुद्ध अनेक लढाया केल्या आणि जिंकल्या. त्यांच्या गनिमी युद्ध कौशल्याचा शत्रूंवर मोठा प्रभाव पडला.त्यांची धोरणे, लष्करी योजना आणि युद्धकौशल्य यामुळे सर्वांनी त्यांचा आदर केला.

औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना कपटाने कैद केले होते. पण आपल्या बुद्धिमत्ता आणि हुशारीमुळे ते कैदेतून सुटले आणि नंतर औरंगजेबाच्या सैन्याशी लढले. पुरंदर तहात दिलेले 24 किल्ले त्यांनी परत जिंकले.

बलाढ्य सैन्य, रयतेप्रती प्रेम,स्त्रियांचा आदर अशा अनेक गुणांमुळे त्यांची महती जगभरात पोहोचली.  3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link