विमान प्रवासातील टर्ब्युलन्स म्हणजे नेमकं काय? अशा वेळी प्रवाशांनी काय करावं?

Sat, 25 May 2024-10:52 am,

turbulence Meaning : विमान प्रवास पहिला असो किंवा नेहमीचा, या प्रवासाच भीतीमुळं एकदातरी धाकधूक वाढते, पोटात भीतीनं गोळाच येतो, हे असं अनेकांसोबत घडतं. आकाशात झेपावणाऱ्या विमानात बसल्यानंतर त्यातून उतरेपर्यंत काही मंडळींना भलत्याच चिंता लागलेल्या असतात. त्यातच जर टर्ब्युलन्सच्या सूचना मिळाल्या, तर या भीतीत भर पडलीच म्हणून समजा. 

'This Flight is going through turbulence' किंवा 'ये जहाज टर्ब्युलन्स से गुजर रहा हैं|' अशा सूचना मिळाल्या की, लगेचच विमानातील प्रवाशांना तातडीनं सीटबेल्ट लावण्यास सांगितलं जातं. काही प्रसंगी विमान एखाद्या टर्ब्युलन्समधून जातं, तर काही वेळा एकाहून अधिक टर्ब्युलन्सचा सामना विमान करत असतं. 

असं नेमकं का होतं? फ्लाइट टर्ब्युलन्समागे अनेक कारणं असून, यातील मुख्य कारण म्हणजे हवेच्या झोतामध्ये होणारे बदल. ज्यावेळी हवेचा दाब विमानाच्या पंखांवर थेट येतो तेव्हा ही पंख हलू लागतात. विमानावरील पंखांवर असणारी हवा असंतुलित झाल्यास त्यामुळं आत बसलेल्या प्रवासी आणि क्रू मेंबर्सना धक्के जाणवून एक चिंतेचा माहोल निर्माण होतो. 

 

जी हवा विमान उडवण्यास मदत करते त्यातच ढग आले तर, विमानाला कमी जास्त प्रमाणात धक्का लागतो आणि ते अतिप्रचंड वेगानं वरखालीसुद्धा होतं. अशा प्रसंगी प्रवाशांना सीटवरून न उठण्याच्या सूचना करण्यात येतात. 

 

टर्ब्युलन्सच्या वेळी प्रवाशांमध्ये जितकी अस्थिरता निर्माण होते त्या तुलनेत वैमानिकांमध्ये स्थिर माहोल पाहायला मिळतो. कॉकपिटमध्ये असणाऱ्या अनेक उपकरणांमुळं हे शक्य होतं. शिवाय समोर असणाऱ्या मोठ्या काचांमुळं विमानापुढं येणारं संकट नेमकं किती मोठं असेल याचा अंदाज त्यांना असतो. 

एखाद्या विमानप्रवासादरम्यान टर्ब्युलन्सचा सामना करावा लागल्यास, खिडकीजवळील सीट मोठा दिलासा देऊ शकते. अशा परिस्थितीत खिडकीबाहेर पाहणं मेंदूमधील गोंधळ थांबवण्यास मदत करतं. 

 

विमानात टर्ब्युलन्सच्या वेळी भीती वाटल्या किंवा बेचैन वाटल्यास दीर्घ श्वास घेऊन तो तोंडानं सोडल्यासही मोठी मदत होते. या क्रियेमुळं मज्जासंस्था शांत होऊन आराम मिळतो. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link