PHOTO: Skoda ची सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक SUV कार लाँच; अडल्ट आणि चाईल्ड सेफ्टीमध्ये 5-स्टार रेटिंग

वनिता कांबळे Wed, 12 Jun 2024-3:00 pm,

Skoda कंपनीने आपली नवी Skoda Kushaq Onyx ही SUV कार भारतात लाँच केली आहे. स्कोडाची ही  सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक SUV कार आहे. 

Active आणि Ambition अशा दोन व्हेरियंटमध्ये ही कार लाँच करण्यात आलेय. या कारची स्टार्टिंग प्राईज 13.49 लाख इतकी आहे. 

 

 2022 मध्ये या कारची क्रॅश टेस्ट  झाली होती. यात अडल्ट सेफ्टीत 34 गुणांपैकी 29.64 गुण आणि चाईल्ड सेफ्टीत 49 पैकी 42 गुण मिळाले. 

या कारमध्ये 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रांसमिशन गिअरबॉक्स आहे. 

 इंजिन  115Ps पॉवर आणि 178Nm टॉर्क जनरेट करते. भारतीय ग्राहकांना लक्षात घेऊन  ही कार तयार करण्यात आलेय. 

 

पॉवर आणि परफॉर्मन्सच्या बाबतीतदेखील ही कार अत्यंत दमदार आहे. या कारमध्ये 1.0 लिटर क्षमतेचे 3 सिलेंडर टर्बो-पेट्रोल TSI इंजिन वापरले आहे.

 

Skoda Kushaq Onyx या SUV कारला अडल्ट आणि चाईल्ड सेफ्टीमध्ये 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link