अरबपती असूनही रमेश बाबू करतात `न्हावी`चं काम

Sun, 03 Jun 2018-1:57 pm,

अनेकदा  श्रीमंत होण्यासाठी उच्च शिक्षण, भाषेवर प्रभूत्त्व असावे असे वाटते. मात्र केस कापणं या कामातून  अरबपती झालेले रमेश बाबू मात्र अनेक गोष्टींना अपवाद आहे. त्यांंचा प्रवास थक्क करणारा आहे. 

रमेश बाबूंच्या वडिलांचे अकाली निधन झाल्यानंतर केस कापण्याचे त्यांचे दुकान 5 महिना  प्रतिमहिना इत क्या स्वस्त दरात भाड्याने दिले. या पैशाने घरादाराला आर्थिक मदत  मिळाली. 

अभ्यासात गती नसल्याने रमेश बाबूंनी वडिलांचा व्यवसाय पुढे चालवण्याचा निर्णय घेतला. न्हाव्हाच्या दुकानालाही नवा मॉडर्न टक दिला. मारूती वॅगनार विकत घेऊन ती भाड्याने दिली. 2004 साली रमेश बाबूंनी टूर अ‍ॅन्ड ट्रावल्सची सुरूवात केली. 

400 गाड्यांंचा ताफा रमेश बाबूंकडे आहे. यामध्ये 9 मर्सडीज, 6 बीएमडब्ल्यू, एक जॅग्वार आणि तीन ऑडी गाड्यादेखील आहेत. ते रॉल्स रॉयसदेखील चालवतात. त्यांंच्याकडे 90हून अधिक ड्रायव्हर आहेत.

अमिताभ बच्चन पासून  शाहरुख पर्यंत अनेक सेलिब्रिटी त्यांचे क्लायंंट आहे. लग्जरी टैक्सी सर्विस सुरू केल्यानंतर त्यांची लिस्ट वाढत आहे. मुंबई, कोलकत्ता येथे त्यांचे सर्वाधिक क्लायंट आहेत.  

रमेश बाबू त्यांच्या मुलांंनाही या व्यवसायाचे धडे देत आहे. काम असल्याने त्यामध्ये प्रोफेशनल राहणं गरजेचे आहे. लहान असल्याने त्यांंना काम अजून दिले जात नाही.

विजयवाड्यामध्ये वेंचर सुरू करण्याचा रमेश बाबूंचा प्रयत्न आहे. हैदराबादसारख्या मोठ्या शहरात व्यवसाय सुरू करण्यात वेळ घालवण्यापेक्षाअ लहान शहरात अधिक जास्त संधी असल्याने तेथे सलोन आणि टॅक्सी सर्विस सुरू करण्याची इच्छा आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link