PHOTO: सोन्याचं अख्खं विमान, 7000 आलीशान कार; दुबईचा राजा फिका पडेल एवढ्या संपत्तीचा मालक आहे हा सुलतान!

Soneshwar Patil Wed, 04 Sep 2024-5:55 pm,

ब्रुनेई देश राजेशाही पद्धती, मूलगामी नियम आणि सुलतान यासाठी ओळखला जातो. येथील बंदर सेरी बेगवान हे येथील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असून ती या या देशाची राजधानी आहे. 

जेव्हा जेव्हा या देशाची चर्चा होते तेव्हा तेथील सुलतानबद्दल देखील चर्चा होते.  या सुलतानचे नाव हसनल बोल्किया असं आहे. तो जगातील सर्वात श्रीमंत सुलतानांपैकी एक आहे. 

हसनल बोल्किया 59 वर्षे सम्राट आहेत. ते लक्झरी जीवनशैलीसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. रिपोर्टनुसार, त्याच्या कलेक्शनमध्ये 7 हजारांहून अधिक कार आहेत. 

या कारची किंमत अंदाजे 5 अब्ज डॉलर्स असल्याचं सांगण्यात येत आहे. GQ च्या अहवालानुसार, सुलतानच्या कार कलेक्शनमध्ये सुमारे 300 फेरारी आणि 600 पेक्षा अधिक रोल्स-रॉयस कार आहेत. 

डेली मेलच्या वृत्तानुसार, सुलतानकडे सोन्याने मढवलेले खासगी जेटही आहे. याची किंमत सुमारे 400 दशलश डॉलर्स आहे. त्याचबरोबर सुलतानकडे गोल्ड प्लेटेड रोल्स रॉयस कार देखील आहे. 

सुलतान बोल्किया आणि त्याचे राजघराणे ही खास सोन्याचा मुलामा असलेली कार फक्त खास प्रसंगी आणि कार्यक्रमांसाठी वापरतात. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link