IND vs SL 1st T20 : `सूर्याला ओळखण्यात चूक झाली...`, गंभीरच्या वक्तव्यावर `कॅप्टन स्काय`ने दिलं खणखणीत उत्तर

Saurabh Talekar Fri, 26 Jul 2024-8:50 pm,

एखाद्या खेळाडूची सर्वोत्तम क्षमता ओळखणं आणि ते जगाला दाखवणं ही लिडरची प्रमुख भूमिका असते, असं गौतम गंभीरने आयपीएलनंतर म्हटलं होतं.

माझ्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत मला एक खंत असेल तर ती म्हणजे सूर्यकुमार यादवचा त्याच्या क्षमतेचा सर्वोत्तम वापर करू शकलो नाही, असं गौतम गंभीर म्हणाला होता.

पहिल्या टी-ट्वेंटी मालिकेपूर्वी जेव्हा सूर्यकुमार यादवला पत्रकारांनी गौतम गंभीरच्या वक्तव्यावर सवाल विचारला तेव्हा सूर्याने खणखणीत उत्तर दिलं.

अभी तो करेंगे पुरा क्षमता को उपयोग, असं म्हणत सूर्यकुमार यादवने उत्तर दिलं. सूर्याचं उत्तर ऐकून पत्रकारांना देखील हसू आवरलं नाही.

दरम्यान, मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री करण्यापूर्वी सूर्यकुमार यादव केकेआरमध्ये होता. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली तो खेळला देखील आहे. परंतू त्याला जास्त संधी मिळाली नव्हती.

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link