`हिट मॅन`चा जलवा! वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात अर्धा डझन विक्रम; धोनीही पडला मागे

Swapnil Ghangale Thu, 06 Jun 2024-11:13 am,

न्यूयॉर्कमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय वेगवान गोलंदाजीसमोर आर्यलंडच्या फलंदाजाचा फारसा निभाव लागला नाही. संपूर्ण संघ 16 षटकांमध्ये 96 धावांवर तंबूत परतला.

 

भारताकडून हार्दिक पंड्याने 27 धावांमध्ये 3 विकेट्स घेतल्या. तर बुमराहने 6 धावांत 2 आणि अर्शदीपने 35 धावांत 2 विकेट्स घेत आयर्लंडच्या फलंदाजींना तंबूचा रस्ता दाखवला.

 

छोट्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी रोहित आणि विराट कोहलीची जोडी मैदानात उतरली. मात्र तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कोहली 5 बॉलमध्ये 1 धावा करुन झेलबाद झाला.

 

मात्र रोहितने तुफान फटके बाजी केली. त्याला ऋषभ पंतची चांगली साथ मिळाली. एक उसळी घेणारा चेंडू खांद्याला लागल्याने रोहित जखमी होऊन मैदानाबाहेर गेला. 

 

रोहितने 37 बॉलमध्ये 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 140.54 च्या स्ट्राइक रेटने 52 धावा केल्या. या 52 धावांच्या खेळीत रोहितने पाच मोठे विक्रम केले.

टी-20 अंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये रोहितने 4 हजार धावांचा टप्पा गाठला.

रोहितने 52 धावांच्या खेळीदरम्यान टी-20 वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये 1000 धावा पूर्ण करण्याचा विक्रमही केला. 

 

अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकारांचा टप्पाही रोहितने या सामन्यात लगावलेल्या 3 षटकारांमुळे पूर्ण केला. रोहित इतके षटकार टी-20 मध्ये कोणीही लगावलेले नाहीत अगदी ख्रिस गेलनेही नाही.

 

सर्वात कमी चेंडूंमध्ये अंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 4 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम रोहितने आपल्या नावे केला आहे. रोहित वगळता इतर कोणालाही अंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये अधिक वेगाने 4 हजार धावा करता आलेल्या नाहीत. 

टी-20 मध्ये 4 हजार धावा पूर्ण करणारे जगात तीन फलंदाज आहेत. रोहित शिवाय या यामध्ये विराट कोहली आणि बाबर आझम हे अन्य दोन दिग्गज आहेत.

आयसीसीच्या मर्यादीत षटकांच्या स्पर्धांमध्ये 100 षटकारांचा टप्पा ओलांडणारा रोहित हा पाहिलाच भारतीय खेळू ठरला आहे.

 

कर्णधार म्हणूनही रोहित शर्माने धोनीलाही मागे टाकलं आहे. टी-20 अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकवून देणारा कर्णधार म्हणून रोहित शर्मा पहिल्या स्थानी आला आहे. त्याच्या नेतृत्वाखालील हा भारताचा 42 वा विजय होता. धोनीने 72 पैकी 41 सामने भारताला जिंकून दिले. रोहितने 55 पैकी 42 सामने भारताला जिंकून दिले आहेत.

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link