कोणालाच जमलं नाही ते Tata ने करुन दाखवलं! 28 KMPL मायलेज, नव्या CNG कार्स लॉन्च; किंमत...

Swapnil Ghangale Thu, 08 Feb 2024-1:36 pm,

देशातील प्रमुख वाहननिर्मिती कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने आज भारतीय बाजारपेठेमध्ये असा पराक्रम करुन दाखवला आहे जो इतर कोणत्याही कंपनीला जमलेला नाही.

टाटा मोटर्सने देशातील पहिलीच ऑटोमॅटिक सीएनजी कार रेंज बाजारात दाखल केली आहे. या कारचे फिचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत किती आहे पाहूयात...

टाटा मोटर्सने आपली सर्वात स्वस्त हॅचबॅक टीयागो सीएनजी एएमटी (Tiago CNG AMT) आणि सेडान कार टीगोर सीएनजी एएमटी (Tigor CNG AMT) या गाड्यांचं ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गेअरबॉक्स व्हर्जन बाजारात आणलं आहे. या गाड्यांची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

टाटा मोटर्सने केलेल्या दाव्यानुसार या दोन्ही ऑटेमॅटिक सीएनजी कार 28.06 किलोमीटर प्रती किलोग्रामचं मायलेज देतात. सध्याच्या कलर ऑप्शनबरोबर कंपनीने काही नवीन रंगांमध्येही या गाड्या उपलब्ध करुन दिल्यात.

टाटा टियागोमध्ये टॉर्नेडो ब्लू आणि टियागो एनआरजीसाठी ग्रासलॅण्ड बीज तसेच रेग्युलर टिगोरसाठी मेट्योर ब्रॉन्झ रंगाचा पर्याय दिला आहे.

टीयागो आयसीएनजी एएमटी (Tiago iCNG AMT) कार एकूण 4 ट्रीममध्ये सादर केली आहे. या कारच्या बेसिक व्हेरिएंटची किंमत 7,89,900 रुपयांपर्यंत (एक्स-शोरुम) आहे. यामध्ये टॉप एक्सझेडए एनजीआर ट्रिमची किंमत 8,79,900 रुपये आहे.

 

टीयागो आयसीएनजी एएमटीच्या XTA व्हेरिएंट 7,89,900 रुपयांना उपलब्ध असून XZA+ व्हेरिएंटसाठी 8,79,900 रुपये मोजावे लागणार आहे. तसेच XZA+ DT व्हेरिएंटची किंमत 8,89,900 रुपये आहे. त्याचप्रमाणे XZA NRG हे टॉप व्हेरिएंट 8,79,900 रुपयांना आहे.

 

टीगोर सीएनजी एएमटी (Tigor CNG AMT) या ऑटोमॅटिक कारचे दोनच ट्रीम कंपनीने सादर केले आहेत. या कारचं बेसिक व्हेरिएंट 8,84,900 रुपयांना असून टॉप व्हेरिएंटची किंमत 9,54,900 रुपये आहे. 21 हजार रुपये भरुन या कार्सची बुकींग करता येणार आहे.

टाटा मोटर्सचे पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडचे प्रमुख अधिकारी अमित कामत यांनी, "सीएनजी कार्सला मागील काही वर्षांमध्ये मोठी मागणी वाढली आहे. टाटा मोटर्सने पहिल्यांदाच यात ट्विन सिलेंडर तंत्रज्ञान वापरलं आहे. हाय एण्ड फिचर्सचा पर्याय आणि थेट सीएनजी स्टार्ट असलेल्या कार बाजारात आणून क्रांती घडवली आहे," असं म्हटलं.

"मागील 24 महिन्यांमध्ये आम्ही 1.3 लाखांहून अधिक सीएनजी कार विकल्या आहेत. मागणी वाढल्याने ग्राहकांना सर्वोत्तम प्रोडक्ट देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही आता ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसहीत टाटा टियागो आणि टिगोर आयसीएनजी लॉन्च केली आहे," असंही कामत म्हणाले.

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link