विकेंडला पार्टनरसोबत रोड ट्रिपचा प्लॅन करताय? मग `या` गोष्टी ठेवा लक्षात!

Thu, 08 Feb 2024-2:18 pm,

तुम्ही जर अचानक रोड ट्रीपला जाण्याचा प्लॅन करत असाल तर बिनधास्त करा. कारण आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत. त्यानुसार तुम्ही तुमच्या रोड ट्रिपसाठी वस्तुची साठवण करु शकता. यामुळे तुमचा प्रवास खूप आनंददायी होईल. रोड ट्रिपरला काय आवश्यक आहे ते  जाणून घ्या...

रोड ट्रिप प्लॅन करण्यापूर्वी  सर्वात महत्त्वाचे असतं म्हणजे ठिकाणं. पण हेच ठिकाण निवडताना हवामानाच अंदाज नक्की घ्या. त्यानुसार तुम्हाला बॅग पॅक करणं सोयीस्कर होईल. अशा ठिकाणांची माहिती तुम्हाला ऑनलाईन मिळू शकते.

महत्त्वाचे म्हणजे खरेदी करण्यापू्र्वी तुम्हाला कोणत्या गोष्टी आवश्यक आहे. अगदी कपड्यांपासून ते खाण्यापर्यंत याची यादी तयार करा. जेणेकरुन बॅग पॅक करताना यादीनुसार वस्तु पॅकिंग केलात तर ट्रिप गेल्यानंतर अमुक राहिल तमुक राहिल,असं बोलण्याची वेळ येणार नाही.

तुम्हाला आवश्यक असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची यादी तयार करा. त्यानुसार सर्व साहित्य बॅगेत ठेवा. मोबाईल चार्जर, पॉवर बँक, इयरफोन, ऑक्स केबल, टॉर्च आणि ब्लूटूथ स्पीकरसह तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पॅक करा. तुमच्या वाहनावरील चार्जिंग पोर्ट तपासा. कारण त्यावर तुम्ही तुमचे डिव्हाइस चार्ज करू शकता. 

तुमच्या आरोग्याची काळजी घेऊन डॉक्टरांनी दिलेली औषधे तुमच्या बॅगेत ठेवा. त्याचप्रमाणे, जर तुम्ही रोड ट्रिपला जात असाल तर कृपया डॉक्टरांना आवश्यक असलेल्या गोष्टींचा विचार करा आणि त्यानुसार डॉक्टरांचा सल्ला घ्या. हवामानाच्या परिस्थितीनुसार, तुम्ही तुमच्यासोबत मूलभूत औषधे, सनस्क्रीन आणि इतर महत्त्वाच्या वस्तू ठेवाव्यात.

अनेकदा तुम्हाला वाटते की, तुम्हाला रस्त्यावर अनेक रेस्टॉरंट्स आणि ढाबे सापडतील. पण अचानक भूक लागली आणि तर सोबत असलेला खाऊ तुमच्यासाठी सोयीस्कर ठरेल. त्यात बिस्किटे, वेफर्स, खाकरा हे पदार्थ घेऊ शकता. तसेच, पाण्याची बाटली आणि काही एनर्जी ड्रिंक्स घेऊन जाण्यास विसरू नका.

तुम्ही जवळच्या रिसॉर्टला जात असाल किंवा लांबच्या ठिकाणी, तुमच्यासोबत योग्य टायर आणि टूल किट असणे महत्त्वाचे आहे. कारण कधी गरज पडेल हे सांगता येत नाही. तुमच्यासोबत योग्य आणि उत्तम प्रकारे तयार केलेले टूल किट ठेवा. तुमच्याकडे असलेले टूल किट योग्य असल्याची खात्री करा. टायर इन्फ्लेटर आणि स्क्रू ड्रायव्हरपासून वायर कटर आणि टॉर्क रेंचपर्यंत सर्वकाही तुमच्या कारच्या मागील बाजूस तयार ठेवा. तसेच, अतिरिक्त इंधनाची व्यवस्था करा कारण तुम्ही सहसा लांबच्या प्रवासाला जाता.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link