मसाले, मीठ, साखर ओलसर लागतेय? करून पाहा हे सोपे घरगुती उपाय...

Thu, 20 Jul 2023-2:38 pm,

Kitchen Tips : तुम्हीही अशाच अडचणीनं त्रस्त आहात का? म्हणजे मसाले किंवा तत्सम पदार्थांमध्ये येणाऱ्या दमटपणामुळं तुम्हीही चिंतेत आहात का? 

 

आता चिंता करायची गरज नाही. कारण, यावरचे काही सोपे उपाय आपण इथं पाहणार आहोत. 

लाल तिखट अर्थात वर्षभर चालेल असा मसाला चांगला ठेवण्यासाठी, त्याला दमटपणा धरु न देण्यासासाठी त्यामध्ये अख्ख्या लवंगी मिरच्या आणि लवंग मिसळा. मसाल्यामध्ये तुम्ही हिंगाचा खडाही ठेवू शकता.  

रोजच्या जेवणाध्ये वापरली जाणारी हळद चांगली रहावी यासाठी ती लहान लहान डब्यांमध्ये ठेवत त्यामध्ये तमालपत्र ठेवावं. अशानं हळदीमध्ये बाष्प धरत नाही. 

 

पावसाळी दिवसांमध्ये सहसा साखरही हाताला ओलसर भासते. हे टाळण्यासाठी साखरेच्या डब्यात एका पुरचुंडीमध्ये तांदूळ बांधून ठेवा. अशानं तांदुळाची पुरचुंडी पाष्प खेचून घेते. 

 

मीठामध्ये ओलसरपणा येऊ नये यासाठी नेमकं काय करावं याचा विचार तुम्ही करत असाल तर लक्षात घ्या की मीठाच्या डब्यात कायम एक दालचिनीचा तुकडा ठेवा. 

राहता राहिला प्रश्न कडधान्यांचा तर, या गोष्टींमध्ये बाष्प येऊ नये यासाठी तुम्ही तमालत्र, दालचिनी किंवा लवंग मिसळा. लवंगी मिरचीसुद्धा इथं तुमची मदत करू शकेल.  (सर्व छायाचित्र- फ्रिपीक)

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link