दान केलेल्या केसातून 150 कोटींची कमाई करतं तिरुपती मंदिर, जाणून घ्या केसातून कॅशपर्यंतचं गणित

Pravin Dabholkar Fri, 20 Sep 2024-1:53 pm,

तिरुमाला तिरुपती वेंकटेश्वर बालाजी हे मंदिर हिंदु धर्मातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. 7 डोंगरांवर वसलेले हे मंदिर तिरुमाला देवस्थान ट्रस्टद्वारे चालवले जाते.

तिरुपती बालाजी मंदिरात गेल्यावर केस दान करण्याच्या परंपरेबद्दल तुम्ही ऐकले असेल. भाविकांनी दान केलेल्या केसातून मंदिराकडे करोडोची कॅश जमा होते. 

मंदिराला दान मिळणाऱ्या केसांतून ट्रस्टला 120 कोटींपर्यंतची कमाई होते. पण 2023 या वर्षी ही कमाई 150 कोटींपर्यंत पोहोचली होती. पण ही कमाई नेमकी कशी होते? जाणून घेऊया. 

तिरुपती मंदिरात जाऊन लोक केस अर्पण करतात. वेंकटेश्वर देवाची आराधना 'मूक्कू' चा हा एक भाग आहे. तिरुपति मंदिरात येणाऱ्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे येते केस दान देखील वाढले आहे. यामुळे मंदिराची कमाईदेखील वाढली आहे.

तिरुमालामध्ये आतापर्यंत केवळ कल्याणकट्टा येथे केस दान करता येत होते. पण आता मंदिर ट्रस्टने इतर जागांवर केस दानाची व्यवस्था केली आहे. 

यामुळे भक्तांना दिलासा मिळाला आहे. तसेच मंदिराची कमाईदेखील वाढली आहे. गेल्या 5 ते 6 वर्षात मंदिराच्या कमाईत वेगाने वाढ होत चालली आहे. 

मंदिर ट्रस्ट वर्षातून 4 ते 5 वेळा आपल्याकडे आलेल्या केसांचा लिलाव करतं. यात दानात मिळालेल्या केस अनेक ग्रेड्समध्ये विभागले जातात. मग त्यांचा लिलाव होतो.

कलर किंवा डाय केलेले केस, पांढरे केस, काळे केस इं. वेगळे केले जातात. यानंतर त्याचा लिलाव ग्रेडच्या आधारे केला जातो. 

तिरुमाला तिरुपती देवस्थानम ट्रस्ट प्रत्येक दिवशी दानमध्ये आलेल्या केसांतून 1400 किलो गाळ एकत्र करते. हे केस सुखल्यानंतर साधारण 1 टन इतके होतात. त्यानंतर हे केस गोदामात पाठवले जातात. 

कोरोना काळानंतर तिरुमाला तिरुपतिला येणाऱ्या भक्तांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे दान करण्यात येणाऱ्या केसांची संख्यादेखील वाढतेय. 

2023 मध्ये 4 वेळा केसांचा लिलाव करुन तिरुपती मंदीर ट्रस्टला 150 कोटी कमाई झाल्याची माहिती समोर येत आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link