Chandrayaan - 3: चांद्रयान-३ चे होणार तुकडे? विक्रम लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून करण्याची तयारी सुरु..

Thu, 17 Aug 2023-12:47 pm,

 17 ऑगस्ट रोजी विक्रम लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळं करण्यात येणार आहे. चांद्रयान 3 मोहिमेतील हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. 

 

 14 जुलै रोजी भारताचे चांद्रयान-3 हे दिशेने झेपावले आहे. मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स, इसरो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क, बंगळुरूकडून हे यान लॉन्च करण्यात आले असून येथूनच कंट्रोल केले जात आहे.

मॉड्युलपासून लँडर वेगळा झाल्यानंतर चांद्रयान-3 चे वजन 3900 वरुन 2100 किलोवर येणार आहे. 

चंद्रावर विक्रम लँडर उतरल्यावर काही तासांनी लँडरच्या पोटातून 'प्रज्ञान' नावाचा रोव्हर बाहेर पडत चांद्र भुमिवर संचार करणार आहे. 

 

 मॉड्युलपासून लँडर वेगळा झाल्यानंतर चांद्रयान-3 चंद्रापासून 100 किलोमीटरच्या कक्षेत पोहचणार आहे.  23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चे चंद्रावर सॉफ्ट लँडिग केले जाणार आहे. 

 

लँडिंग करण्यापूर्वी, चांद्रयानचे प्रोपल्शन मॉड्यूल वेगळे  झाल्यानंतर यानाचे वजन 2100 किलो इतक होणार आहे. 

प्रोपल्शन मॉड्यूलचे वजन 2148  किलो इतके असून लँडर मॉड्यूलचे वजन 1752 किलो आहे. तर, रोव्हर प्रज्ञानचे वजन केवळ 26 किलो आहे.

प्रोपल्शन मॉड्यूल,  लँडर आणि रोव्हर यामुळे सध्या चांद्रयान 3 चे एकूण वजन जवळपास  3 हजार 900 किलो इतके आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link