Viral News : महिलेने पाळीव श्वानाच्या मदतीने दिला मुलाला जन्म, गरोदर काळात दिलं होतं प्रशिक्षण

Wed, 05 Jul 2023-12:44 pm,

ब्रिटनमधील या महिलेला ऑटिझमचा त्रास आहे. त्यामुळे तिच्या मदतीसाठी श्वानाला प्रशिक्षण देण्यात आले होते. 

हा श्वान महिलेच्या प्रसूतीच्या वेळी हॉस्पिटलमध्ये तिच्यासोबत होता. डॉक्टरही हे पाहून घाबरले होते.

 यूकेमध्ये प्रसूतीच्या काळात महिलेसोबत श्वान युनिटमध्ये जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

रिपोर्टनुसार या महिलेचं नाव एमी टॉम्पकिन असं असून तिच्या श्वानाचं नाव बेले आहे. ती म्हणाली की, बेले नसती तर तिच्यासाठी हा प्रवास खूप कठीण झाला असता. 

बेलेच्या मदतीने तिने पहिल्या मुलाला जन्म दिला त्याचं नाव आहे ऑली. तो झाल्यापासून बेले बाळाचं संरक्षणात्क ढाल बनलं आहे. 

ऑटिझम असल्याने महिलीची सर्व कामं बेले करत असतं. तिच्या आरोग्यापासून सगळं बेले बघत होती. 

बेले या घरात आली ती एक लहानसं क्यूट पिल्लू होती. पण तिच्या साथीने माझा ऑटिझमसोबत गर्भवतीपणाचा काळ सहज पार पडला. 

ती म्हणाली की, बेलेला माहिती आहे की, तिला पॅनिक अटॅक कधी येणार आहे, त्यात काय करायचं आहे. बेले अगदी त्या महिलेच्या सोबत बेडवर झोपली होती. 

बेलेला त्या महिलेने बाळाच्या हृदयाचे ठोके आणि स्वत:चे हृदयाचे ठोके यातील फरक ओळखायला शिकवलं. 

बेलेने ऑलीला पाहिल्यापासून एक सेकंद एकटं सोडलं नाही. ते दोघे आता चांगले मित्र झाले आहेत. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link