Vitamin B12 मिळविण्यासाठी मटण, मासे खाण्याची गरज नाही, या शाकाहारी पदार्थांमधून भरपूर पोषक घटक

Surendra Gangan Sat, 18 Mar 2023-3:26 pm,

शाकाहारी लोकांनी Vitamin B12 साठी दूध पिणे योग्य आहे. कारण दुधामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, परंतु त्यामध्ये व्हिटॅमिन बी 12 देखील चांगले असते. जर तुम्ही रोज एक ग्लास लो फॅट दूध प्यायले तर शरीरात B12 ची कमतरता भासणार नाही.

मटण आणि मासे वगळता दहीमधूनही Vitamin B12 मिळते. आपण सहसा जेवणानंतर दही खातो जेणेकरुन पचनक्रिया व्यवस्थित चालते. परंतु व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दुग्धजन्य पदार्थांद्वारे देखील पूर्ण केली जाऊ शकते. एक कप दह्यामध्ये 28 टक्के Vitamin B12 असते.

शाकाहारी लोकांनी काही फळे आणि भाज्या खाण्यास प्राधान्य दिले तर Vitamin B12 ची गरज पूर्ण होऊ शकते. अनेक ताजी फळे आणि भाज्या (Fruits and Vegetable) आहेत, ज्यांच्या सेवनाने  Vitamin B12 मिळते. बटाटे, मशरुम, बीटरुट इत्यादी व्हिटॅमिन बी 12 मिळते. जर तुम्ही हे नियमितपणे खाल्ले तर शरीरात B12 ची कमतरता होणार नाही.

व्हिटॅमिन बी 12 मिळण्यासाठी फोर्टिफाइड तृणधान्याला प्राधान्य द्या. तसेच लोह, व्हिटॅमिन ए आणि फोलेट देखील आढळतात. यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात ओटमील, ओट्स आणि इतर संपूर्ण धान्यांचा समावेश करु शकता.

शाकाहारी लोकांनी फोर्टिफाइड नॉन-डेअरी दुधाच्या पदार्थांना प्राधान्य दिले पाहिजे. गाय, म्हैस आणि शेळीच्या दुधाबरोबरच अशी अनेक फोर्टिफाइड नॉन-डेअरी दूध आहेत ज्यात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता नसते. आपण दररोज सोया दूध आणि बदामाचे दूध पिऊ शकता.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link