मुंबईतला वेटर ते चीनमधला Movie Star... भारतीयाचा प्रेरणादायी प्रवास; 8 हॉटेल्सचाही आहे मालक!

Swapnil Ghangale Fri, 04 Aug 2023-3:40 pm,

भारतामध्ये एकेकाळी वेटर म्हणून काम करणारा एक भारतीय तरुण भारतीय आज चीनमधील घराघरातील ओळखीचा चेहरा झाला आहे. या व्यक्तीचं नाव आहे देव रतुरी!

देव खरं तर एक उद्योगपती आहे. पदेशात त्याची एकूण 8 रेस्तराँरंट आहेत.

देवने आतापर्यंत अनेक चिनी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

आज देव हा चीनमधील चित्रपट सृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओखळला जातो. देवचा इथपर्यंतचा प्रवास फारच कठीण आणि खडतर होता.

देव हा चीनमध्ये इतका लोकप्रिय आहे की तेथील सातव्याच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्याच्या संघर्षावर एक धड्याचा समावेश करण्यात आला आहे. त्याच्या संघर्षातून आज चिनी मुलं प्रेरणा घेत आहेत.

सध्या देव त्याच्या उत्तराखंडमधील मूळ गावी केमरया सौडमध्ये सुट्ट्यांसाठी आला आहे. टिहरी जिल्ह्यामधील भिलंगना ब्लॉकमध्ये असलेल्या याच गावात 47 वर्षांपूर्वी देवचा जन्म झाला होता. 

देवचं शिक्षण राजकीय इंटर कॉलेज चमियाला (लाटा) येथे झालं. दहावीपर्यंत इथं शिक्षण घेतल्यानंतर 1998 मध्ये देव नोकरीच्या शोधात दिल्लीला गेला. 

अभिनेता होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या देवनं कला क्षेत्रात संधी मिळावी म्हणून तो मार्शल आर्ट शिकला. त्यानंतर तो मुंबईला आला. 

8 वर्ष देव मुंबईमध्ये राहून हॉटेलमध्ये वेटर म्हणून नोकरी करायचा.

वेटर म्हणून नोकरी करतानाच त्याने काही टीव्ही मालिकांमध्ये आणि नाटकांमध्ये काम केलं.

 

मागील 18 वर्षांपासून देव पत्नी अंजली आणि 2 मुलांसहीत चीनमध्ये वास्तव्यास आहे.

आतापर्यंत देवने 35 चिनी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

देव मुंबईमधून वेटर म्हणून काम करण्यासाठी चीनमध्ये गेला होता. मात्र आज तो तेथील प्रसिद्ध अभिनेता आहे. आता त्याला भारतीय चित्रपटांमध्ये काम करायचं आहे.

देव हा चीनमधील मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असून त्याने अनेक चिनी नाटकं आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

माय रुममेट इज डिटेक्टीव्ह आणि द ट्रॅप्ड यासारख्या नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये देवने अभिनय केला आहे.

 

देवने 2013 मध्ये चीनमध्ये पहिलं भारतीय रेस्तराँरंट सुरु केलं. सध्या त्याच्या नावावर 8 रेस्तराँरंट आहेत.

देवच्या मालकीच्या या 8 हॉटेल्समधील 50 हून अधिक कर्मचारी हे उत्तराखंडमधील आहेत.

सध्या देव हा चीनमध्ये अभिनेता आणि उद्योजक म्हणूनही ओळखला जातो. 

आपल्या भारतीय रेस्तराँरंटमध्ये अगदी उत्साहाने भारतीय सणवार साजरे केले जातात असं देव सांगतो.

देवच्या रेस्तराँरंटमधील वेटर्सचे कपडेही भारतीय संस्कृतीप्रमाणेच आहेत. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link