PHOTOS: महिला क्रिकेटरने जेव्हा कपडे काढून केले होते फोटोशूट, काहींनी केले कोतूक तर काहींनी टीका

Sat, 30 Oct 2021-10:20 pm,

सारा टेलरने इतिहास रचला आहे. फ्रेंचायझी क्रिकेट संघाची ती पहिली महिला प्रशिक्षक ठरली आहे. अबुधाबी T10 लीग 19 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. साराला अबुधाबी संघाची सहाय्यक प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. मुख्य प्रशिक्षक पॉल फारब्रेस आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू लान्स क्लुजनर यांच्यासोबत ती संघाची जबाबदारी सांभाळणार आहे. (फोटो: Instragram/sjtaylor30)

सारा टेलर 2017 साली महिला विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लिश संघाचा भाग होती. तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6533 धावा केल्या आहेत. साराने 126 एकदिवसीय सामन्यांमध्ये 38.26 च्या सरासरीने 4056 धावा केल्या आहेत. यामध्ये 7 शतके आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे. टेलरची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या 147 धावा आहे. साराने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. (फोटो: Instragram/sjtaylor30)

महिलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी सारा टेलरच्या या उपक्रमाचे खूप कौतुक झाले, परंतु अशा फोटोशूटसाठी अनेकांनी तिच्यावर जोरदार टीका केली. विशेष म्हणजे, साराला तिच्या आयुष्यात मानसिक समस्यांचा सामना करावा लागला आहे, परंतु कालांतराने ती त्यातून बाहेर पडायला शिकली आहे.

सारा टेलर पुढे म्हणाली, 'इतर महिलांप्रमाणे मलाही माझ्या शरीराबद्दल तक्रार करण्याची सवय आहे, पण आता मी त्यावर मात केली आहे. एक प्रकारे हे महिला सक्षमीकरण आहे. प्रत्येक दुसरी मुलगी सुंदर दिसते. कृपया लक्षात ठेवा की प्रत्येक मुलगी सुंदर असते. महिलांनी मानसिक आणि शारीरिक समस्यांमधून बाहेर पडण्याची गरज आहे.

तिच्या इंस्टाग्रामवर न्यूड फोटो शेअर करताना सारा टेलरने लिहिले की, 'जो कोणी मला ओळखतो त्याला हे समजेल की हा फोटोशूट माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचा आहे, पण मी या मोहिमेचा एक भाग आहे. याचा मला अभिमान वाटतो  यासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल 'वुमेन्स हेल्थ यूके' मासिकचे मी आभारी आहे.'

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link