Summer Tips: काळ्या मातीचा माठ चांगला की लाल मातीचा? कोणत्या माठात पाणी राहिल फ्रिजसारखं थंडगार? जाणून घ्या

Tue, 12 Mar 2024-3:51 pm,

उन्हाळा जवळ आला की सगळ्यांची माठ आणण्याची लगबग सुरू होते. कारण माठतलं पाणी फ्रीजसारख्या पाण्यासारखे नसते. फ्रिजमधल्या गार पाण्यानी तात्पुरते बरे वाटत असले तरी माठातल्या पाण्याची सर कशालाच येणार नाही. 

माठ आणताना आपल्या मनात अनेक प्रश्न असतात. नळ असलेला माठ गळणार तर नाही ना, कशाप्रकारचा माठ जास्त दिवस टिकायला चांगला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काळ्या मातीचा माठ चांगला की लाल मातीचा? 

लाल माठ विटांच्या मातीपासून बनवला जातो तर काळा माठ काळ्या दगडापासून बनवला जातो. त्यामुळे पाणी जास्त थंड राहतं. 

फ्रिजच्या पाण्याच्या तुलनेत काळ्या माठातलं पाणी प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते. काळा माठ घेतल्यानंतर सगळ्यात आधी साबणाच्या पाण्याने आणि साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

त्यानंतर पूर्ण एक दिवस माठात पाणी भरून ठेवा त्यानंतर त्यातलं पाणी काढून घेऊन पुन्हा ताजं पाणी भरून ठेवा. यामुळे माठातलं पाणी गार राहण्यास मदत होईल. 

पाणी गार राहण्यासाठी पाण्याचा माठ हा बाहेरील बाजूने थंड राहणंही तितकंच महत्वाचे असते. यासाठी एक पांढरा कॉटनचा रूमाल किंवा मोठं कापड ओलं करून माठाच्या चारही बाजूंनी गुंडाळून ठेवू शकता. 

माठातलं पाणी पोटासाठी अनेकदृष्या फायदेशीर ठरते. मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणी नॅच्युरल एल्कलाईन असते. ज्यामुळे पीएच संतुलन चांगले राहण्यास मदत होते. रोज माठातलं पाणी प्यायल्याने गॅस, एसिडिटी यांसारख्या पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link