मुघलांच्या हरममध्ये महिलांसोबत असायचे किन्नर, पण का? यामागे बादशाहची मोठी रणनीती

Mon, 06 Nov 2023-2:47 pm,

Mughal Emperor: आपल्याला शाळेच्या पुस्तकांमध्ये मुघलांचा इतिहास शिकवला गेलाय. पण त्या धड्यांमध्ये मुघल किती महान होते, बुद्धिमान, कौशल्यधारी, विशाल सैन्य आणि त्यांचे राजकारण याची माहिती देण्यात आली.

पण या पलिकडे जाऊनही मुघलांचा इतिहास फार मोठा आहे. अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांना कधी याबद्दल शिकवण्यात आले नाही. 

मुघल काळातील राजांच्या अय्याशीच्या कहाण्या समोर येत असतात. अकबराच्या हरममध्ये 5000 महिला होत्या. ज्यांनी त्यांची सेवा केली होती. अकबराच्या हरमच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. हरममध्ये राहणार्‍या किन्नरांबद्दल जाणून घेऊया. 

मुघल हरमची कहाणी तुम्ही कधी ऐकली नसेल. कदाचित ही ऐकून तुम्हाला आश्चर्यही वाटू शकेल. अकबराच्या हरममध्ये 5 हजार महिला होत्या हे तुम्हाला माहिती असेल. पण याशिवाय या हरममध्ये किन्नरांचेही वास्तव्य होते.

अकबराच्या राण्यांसोबत किन्नरांचे काय काम? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. वास्तविक, किन्नरांना हरममध्ये ठेवण्यामागे एक विचारी रणनीती होती. या हेममध्ये षंढ रात्रभर काय करत होते? ते जाणून घेऊया.

लेखक निकोलाओच्या मते, किन्नर अकबराचा मोठा विश्वासू होता. त्यामुळे किन्नर हे हरममध्ये सैनिक म्हणून काम करत असत. 

किन्नर हरमला संपूर्ण सुरक्षा पुरवत असत. स्त्रियांना राण्यांच्या सेवेसाठी ठेवण्यात आले होते. स्त्रिया स्वतःचे संरक्षण करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम नव्हत्या, असे त्याकाळी मानले जायते. त्यामुळे हरमची सुरक्षा किन्नरांकडे सोपवण्यात आली होती.

हरममध्ये काम करणाऱ्या सर्व महिला आणि नपुंसकांना या कामासाठी पगार दिला जात असे. 

निरीक्षक पदावर असलेल्या व्यक्तीला जास्तीत जास्त 1,000 रुपये दिले जात होते.

इतर सर्वांना महिन्याला दोन रुपये मिळाले. यातून हे लोक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link