महिला साधूही असतात विना कपड्यात? आतापर्यंत एकाच महिला मिळाली निर्वस्त्र राहण्याची परवानगी

नेहा चौधरी Mon, 22 Jul 2024-5:12 pm,

भारत हा ऋषी आणि संतांचा देश असून त्यांचे जीवनही खूप रोमांचक राहिल आहे. काही संत आणि ऋषी असे आहेत जे केवळ विशेष प्रसंगी जगासमोर येतात. यामध्ये नागा साधूंचा समावेश होतो. सामान्यतः लोकांना फक्त पुरुष नागा साधूंबद्दल माहिती असते, तर पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधू देखील असतात हे खूप कमी लोकांना माहिती आहे. 

 

नागा साधू आपण कुंभ मेळ्याच्या वेळी पाहिले आहेत. प्रत्यक्षातही काही लोकांनी या नागा साधूंचा अनुभव घेतला आहे. भगव्या कपड्यांमधील हे नागा साधू आदिगुरू शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या विविध आखाड्यांमध्ये राहतात. पुरुष नागा साधू एकही कपडा न घालता अंगाला राख लावून राहतात. मग महिला नागा साधूही विवस्त्र राहतात का?

 

कुंभ आणि महाकुंभ मेळ्यांमध्ये पुरुष नागा साधूंना सार्वजनिक ठिकाणी नग्न राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण महिला नागा साधू फार कमी आहेत आणि क्वचितच जगासमोर त्या जगा समोर येतात. यांना जगासमोर येण्याची परवानगी नाही. सार्वजनिक ठिकाणी त्यांना वस्त्रं घालावी लागतात.

 

कठोर तपश्चर्येनंतर महिला नागा साधू या घडतात. यासाठी त्यांना वर्षानुवर्षे कठोर तपश्चर्या करावी लागते. जिवंत असताना पिंडदान करावं लागतं. त्याशिवा मुंडण करावे लागते आणि नंतर कुठेतरी जाऊन स्त्री नागा साधू बनतात. या महिला नागा साधू जगापासून दूर जंगलात, गुहा आणि पर्वतांमध्ये राहतात आणि भगवंताच्या भक्तीत लीन असतात.

महिला नागा साधू चटकदार केस ठेवतात, कपाळावर तिलक लावतात आणि अंगावर भस्म लावतात. म्हणजेच, ते इतर नागा साधूंसारखे राहतात मात्र कपड्यांशिवाय राहण्याऐवजी ते भगव्या रंगाचे कपडे परिधान करतात. कुंभात स्नान करण्याच्या दिवशी तर महिला साधू या विवस्त्र राहू शकत नाहीत. 

मिळालेल्या माहितीनुसार, भारतात फक्त दशनाम संन्यासिनी आखाडा महिलांना नागा साध्वी बनण्याची परवानगी देण्यात आली आहे. इतर आखाड्यांमध्ये फक्त पुरुषांचा समावेश असतो. महिला नागा साधू केवळ कुंभ आणि महाकुंभ सारख्या विशेष प्रसंगी जगासमोर असं म्हटलं जात. ते काही वेळात येता आणि अचानक गायब होतात. 

आतापर्यंत एकाच नागा साधूला विवस्त्र राहण्याची परवानगी मिळाली आहे. स्वत:ला देवाचा दूत मानणाऱ्या नागा साधूंचं आयुष्य महिला असो किंवा पुरुष खूप कठीण असतं. 

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link