तुम्हीसुद्धा केक, दही, आइस्क्रीम आवडीने खाताय का? मग जरा सावधान, वाढतो ‘या’आजारांचा धोका

Thu, 25 Apr 2024-5:04 pm,

केक, बिस्किटे, ब्रेड, दही आणि आइस्क्रीम यांसारखे खाद्यापदार्थ खायला कोणाला आवडत नाही? मात्र हे खाद्यापदार्थ खाताना सावध राहा.

कारण यात ‘झेंथम’ आणि ‘ग्वार गम’सारख्या इमल्सीफायर्सने समृद्ध असलेले पदार्थ मधुमेहाचा धोका वाढवू शकतात, असे एका अभ्यासात आढळून आले आहे.

इमल्सीफायर्स, सर्वसामान्यपणे बहुतेक वेळा प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये ते अधिक आकर्षक दिसण्यासाठी, त्यांची चव आणि पोत वाढवण्यासाठी तसेच शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी वापरले जातात.

‘द लॅन्सेट डायबिटीस अॅण्ड एंडोक्राइनोलॉजी’मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात म्हटले आहे की, इमल्सीफायर्सचा मोनो आणि डायग्लिसराइड्स ऑफ फॅटी अॅसिडस्, कॅरेजिनन्स, सुधारित स्टार्च, लेसिथिन, फॉस्फेट्स, सेल्युलोज, हिरड्या आणि पेक्टिन्स यांचा टाइप- 2 मधुमेह होण्याच्या जोखमीशी संबंध जोडला आहे.

 यापूर्वी इमल्सीफायर्सचा संबंध स्तन आणि प्रोस्टेटच्या कर्करोगाशी जोडला गेला होता. त्यामुळे खाण्यापूर्वी नक्कीच काळजी घ्या...

फ्रान्सच्या राष्ट्रीय संशोधन संस्था फॉर अॅग्रिकल्चर, फूड अॅण्ड एन्व्हायर्नमेंटमधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासासाठी 1,03,139 जणांचा समावेश केला होता. त्यासाठी 14 वर्षांच्या कालावधीत आढावा घेतला गेला. 

(2009 ते 2023 दरम्यान) इमल्सीफायर्सचे आहारातील सेवन आणि टाइप- २ मधुमेह होण्याचा धोका यांच्यातील संबंधांचा अभ्यास केला. काही इमल्सीफायर्सच्या दीर्घकाळ सेवनामुळे सुमारे 1056 लोकांना मधुमेहाचे निदान झाल्याचे दिसून आले. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link