तुम्हीपण AC खिडकीत लावलाय का? यामुळे होऊ शकते शिक्षा, जाणून घ्या काय आहे नियम?

AC : दिल्लीत एसीमुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काय आहे हे प्रकरण? आणि यामुळे होऊ शकतो थेट कारागृह? 

| Aug 20, 2024, 18:48 PM IST

AC Installation Rules:  दिल्लीच्या करोल बाग परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला. एका इमारतीखाली उभ्या असलेल्या निष्पाप व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये एका व्यक्तीवर एसी पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. 

1/7

काय आहे प्रकरण

अचानक दुसऱ्या मजल्यावरचा एसी थेट स्कूटरवर बसलेल्या तरुणावर पडत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. एसी पडल्यानंतर तरुण स्कूटरवरून खाली पडतो. आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांना अचानक काय झाले ते समजले नाही. ते तरुणाकडे जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. 

2/7

एकाचा मृत्यू तर दुसरा जखमी

या अपघातात 18 वर्षीय जितेशचा मृत्यू झाला, तर 17 वर्षीय प्रांशु जखमी झाला. जितेश हा डोरीवाला येथील रहिवासी होता, तर प्रांशु हा पटेल नगर येथे राहतो. हे दोघं बिल्डिंग खाली उभं राहून गप्पा मारत असल्याचं चित्र सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. 

3/7

AC मुळे होऊ शकते जेल

दिल्लीत घडलेल्या या घटनेमुळे एक गंभीर प्रश्न उभा झाला आहे. यामध्ये घराच्या बाहेर किंवा खिडकीत लावलेल्या एसीमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकारमुळे हे अधोरेखित झाले आहे की, निष्काळजीपणामुळे ही चूक चांगलीच महागात पडू शकते. कलम 125(ए)/106 बीएनएस अंतर्गत कारागृहात जाऊ शकता. आपण फक्त आपल्याच सुरक्षेचा नाही तर इतरांच्या लोकांच्याही समस्येचा विचार करणे आवश्यक आहे. 

4/7

काय आहे 125(ए)/106 बीएनएस?

भारतीय कायद्यानुसार, जर कुणी निष्काळजीपणामुळे असं कृत्य कर असेल तर त्याचा परिणाम अतिशय धोकादायक असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या प्रकाराला दोषी मनुष्यवधापेक्षा वेगळे मानले जाते आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 106 (किंवा 125-A) अंतर्गत येते. या गुन्ह्यासाठी कमाल 5 वर्षे कारावास आणि दंडाची तरतूद आहे. वैद्यकीय व्यावसायिकांकडून निष्काळजीपणा, वाहन चालवताना निष्काळजीपणा इत्यादी या कलमांतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांची काही उदाहरणे आहेत. प्रत्येक प्रकरणात शिक्षेची लांबी गुन्ह्याच्या गंभीरतेवर आणि इतर परिस्थितींवर अवलंबून असते.

5/7

तुरुंगवासाची तरतूद

निष्काळजीपणामुळे एखाद्याच्या जीविताची किंवा मालमत्तेची हानी झाल्यास तुरुंगवासाची तरतूद आहे. जर एखादी वस्तू, जसे की भांडे किंवा एसी, तुमच्या बाल्कनीतून पडून एखाद्याला दुखापत झाली तर तुम्ही या गुन्ह्यासाठी जबाबदार असाल. याव्यतिरिक्त, जर तुमचा एसी तुमच्या मालमत्तेच्या सीमेपलीकडे जात असेल तर ते अतिक्रमण मानले जाऊ शकते आणि तुमच्यावर कारवाई होऊ 

6/7

कशी काळजी घ्याल?

घरात भांडी किंवा एसी ठेवताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. बाल्कनीत ठेवलेली भांडी पडू नयेत म्हणून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवा किंवा जमिनीवर ठेवा. याव्यतिरिक्त, भांडी बाल्कनीमध्ये ठेवताना संरक्षक रेलिंग बसवणे आवश्यक आहे जेणेकरून ते वाऱ्यामुळे किंवा इतर कोणताही विचित्र प्रकार घडणार नाही, याची काळजी घ्या. 

7/7

लोह्याची फ्रेम लावा

तुम्ही तुमचा एसी देखील काळजीपूर्वक लावा. ती व्यवस्थित बसवली पाहिजे आणि त्याला आधार देणारी लोखंडी चौकटही वेळोवेळी तपासली पाहिजे. पावसामुळे या फ्रेम्स खराब होऊ शकतात. त्यामुळे वेळोवेळी एसी तपासा जेणेकरून अपघात होणार नाही.