बदलापूर हे नाव कसं पडलं, काय सांगतो इतिहास? जाणून घ्या कहाणी!

बदलापूर हे नाव कसं पडलं याबद्दल वेगवेगळ्या कहाण्या सांगितल्या जातात. आपण याबद्दल माहिती घेऊया.

| Aug 20, 2024, 18:39 PM IST

Badlapur History: बदलापूर हे नाव कसं पडलं याबद्दल वेगवेगळ्या कहाण्या सांगितल्या जातात. आपण याबद्दल माहिती घेऊया.

1/8

बदलापूर हे नाव कसं पडलं, काय सांगतो इतिहास? जाणून घ्या कहाणी!

Badlapur History Maratha soldiers used to change their horses Marathi News

बदलापूर हे नाव कसं पडलं याबद्दल वेगवेगळ्या कहाण्या सांगितल्या जातात. आपण याबद्दल माहिती घेऊया. शिवकाळात मराठे सैनिक आपले घोडे येथे बदलायचे, म्हणून बदलापूर नाव पडले, अशी आख्यायिका या शहराच्या नावासंदर्भात सांगितली जाते.

2/8

बऱ्याच महत्त्वाच्या घटना

Badlapur History Maratha soldiers used to change their horses Marathi News

शिवकाळात बदलापूरला जास्त महत्त्व नसावे असे म्हणतात. बदलापूर जरी महत्त्वाचे ठिकाण नसले तरी येथे बऱ्याच महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत व त्या घटनांची नोंद बखरींमध्ये केलेली आहे.

3/8

मौजे बदलापूर

Badlapur History Maratha soldiers used to change their horses Marathi News

पेशवेकाळात बदलापूरपासून सुमारे सहा किलोमीटर लांब आणि बारवी नदीच्या जवळ असलेले चोण हे परगण्याचे मुख्य ठिकाण होते. काही पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये ‘मौजे बदलापूर उर्फ चोण’ असे उल्लेख आढळतो.

4/8

मुक्काम बदलापूर’

Badlapur History Maratha soldiers used to change their horses Marathi News

सन 1738-39 च्या सुमारास रामचंद्र हरी पटवर्धन यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात ‘मुक्काम बदलापूर’ असे लिहिल्याचा उल्लेख आढळतो.

5/8

चिमाजीअप्पा बदलापूर येथे मुक्कामाला

Badlapur History Maratha soldiers used to change their horses Marathi News

साष्टीच्या बखरीत वसई मोहिमेच्या दरम्यान चिमाजीअप्पा बदलापूर येथे मुक्कामाला होते, असा उल्लेख आहे.

6/8

बदलापूर येथे मुक्कामास

Badlapur History Maratha soldiers used to change their horses Marathi News

कळव्याचा पाणबुरुज जिंकताना डागलेल्या तोफांचा आवाज चिमाजीअप्पांनी ऐकला तेव्हा ते बदलापूर येथे मुक्कामास होते. 

7/8

पिलाजीराव जाधवांचा मुक्काम

Badlapur History Maratha soldiers used to change their horses Marathi News

वसईच्या मोहिमेतून वाघोलीला जात असताना सरदार पिलाजीराव जाधवांचा मुक्काम बदलापूर येथे होता, अशी नोंद एका पत्रात आहे. 

8/8

बदलापूरचे महत्त्व वाढायला सुरुवात

Badlapur History Maratha soldiers used to change their horses Marathi News

दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात पेशव्यांच्या सरदारांनी कॅप्टन गॉडार्ड आणि हॉर्टलेचा पराभव कुळगाव, बदलापूरच्या आसपास केला होता. कागदोपत्री पेशव्यांच्या काळात बदलापूरचे महत्त्व वाढायला सुरुवात झाली, असे दिसून येते.