`दिग्दर्शकाने त्याच्या ऑफिसमध्ये मला खुर्चीवर..`; अभिनेत्रीनं सांगितला धक्कादायक अनुभव

Swapnil Ghangale Thu, 16 May 2024-4:54 pm,

जाहिरातींमध्ये काम करण्यापासून अभिनय क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या एका तरुण अभिनेत्रीने तिच्याबरोबर घडलेल्या धक्कादायक प्रकरणाचा खुलासा केला आहे.

 

खरं तर तुम्ही हा चेहरा देशभरातील कोका-कोलाच्या अनेक होर्डिंगवर पाहिला असेल. ती नेव्हीया, लिमका, लक्स, कल्याण ज्वेलर्स, पॅरशूट आणि इतर अनेक जाहिरातींमध्ये झळकली आहे.

 

आयुषमान खुरानाबरोबर ती एका जाहिरातीमध्ये झळकली होती आणि हे होर्डिंग देशभरात झळकले होते. तसेच ती युट्बूर बुवम बामबरोबर एका म्युझिक व्हिडीओतही दिसली आहे.

अमिताभ बच्चन, विवेक ऑबेरॉय, आमिर खान, राजकुमार राव यासारख्या अभिनेत्यांबरोबर ती झळकली आहे. तिने मल्याळम, तेलगू आणि तमिळ जाहिरातींमध्येही काम केलं आहे.

 

ज्या अभिनेत्रीसंदर्भात आपण बोलत आहोत तिचं नाव आहे, ओनिमा कश्यप! ओनिमा मागील काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला अली असून तिच्या अभिनयाने तिने सर्वांनाच भूरळ पाडली आहे.

 

सध्या ओनिमा चर्चेत आहे ती तिच्या 'चाचा विधायक है हमारे 3' या सिरीजमुळे. याच सिरीजसंदर्भात दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने मनोरंजनसृष्टीत तिला आलेल्या कटू अनुभवांसंदर्भात भाष्य केलं आहे. मनोरंजनसृष्टीची काळी बाजू तिने आपल्या अनुभवातून सांगितली आहे.

 

"माझ्या करिअरच्या सुरुवातीला मी वेगवेगळ्या भूमिकांसाठी ऑडिशन देत होते, त्यावेळेस मला एका दिग्दर्शकाकडून फारच धक्कादायक वागणूक मिळाली," असं ओनिमाचं म्हणणं आहे. 

 

"एका प्रोजेक्टबद्दल बोलायचं आहे असं सांगून मला त्या दिग्दर्शकाच्या ऑफिसमधून कॉल आला होता. मला त्याच्या उद्देशाबद्दल कोणतीही शंका आली नाही आणि मी त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचले," असं सांगत ओनिमाने नेमकं काय घडलं याबद्दलचा घटनाक्रम कथन केला.

 

"मात्र मी तिथे पोहचल्यानंतर प्रोजेक्टबद्दल आणि कथेबद्दल बोलण्याऐवजी त्याने मला खुर्चीवर न बसता उठून जागेवर उभं राहण्यास सांगितलं. मी उभी राहिल्यानंतर त्याने मला गोल गिरकी घेण्यास सांगितलं. मी कशी दिसतेय हे त्याला न्यहाळून पाहायचं होतं," असं ओनिमा म्हणाली.

 

"मी कशी दिसते यावरुन त्याला मला जज करायचं होतं. माझ्यातील कौशल्याऐवजी माझं दिसणं त्याला महत्त्वाचं वाटत होतं. मला त्याचा हेतू योग्य वाटलं नाही. त्यामुळे मी ऑफिसमधून निघाले आणि पुन्हा कधीच त्या व्यक्तीशी संपर्क केला नाही," असं ओनिमाने सांगितल्याचं 'फ्री प्रेस जर्नल'ने म्हटलं आहे..

 

अभिनय क्षेत्रात नव्याने येणाऱ्यांनी अशी परिस्थिती कशापद्धतीने हाताळावी, अशा वागण्यामागील नेमका उद्देश काय असतो यासंदर्भात ओनिमाला विचारण्यात आलं. त्यावर तिने, "कधीतरी अशा अनुभवांमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. या क्षेत्रातील अनपेक्षितपणा हाताळताना मानसिक त्रास होतो," असं मत व्यक्त केलं.

 

"माझ्या मते मनोरंजन क्षेत्रात प्रवेश करताना तुम्ही फार चाणाक्ष बुद्धीचं असणं गरजेचं आहे. नव्याने या क्षेत्रात येणाऱ्यांसाठी हे फार गरजेचं आहे. आपल्या सुरक्षेसंदर्भात त्यांनी जागृक राहिलं पाहिजे," असं ओनिमा म्हणाली.

 

"काम देण्याच्या नावाखाली गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून अधिक सावध राहिलं पाहिजे," असा सल्ला ओनिमाने या क्षेत्रात येणाऱ्यांना दिला.

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link