कानोसा कोकणचा : हे उमेदवार बाजी मारणार?

Surendra Gangan Tue, 21 May 2019-10:09 pm,

कोकणात रायगडमध्ये शिवसेनेचा दबदबा आहे. मात्र, यावेळी शिवसेनेला नाराजीचा फटका बसण्याची शक्यता असून सेनेला फटका बसताना दिसत आहे. येथे राष्ट्रवादी जम बसविणार असे दिसत आहे. रायगडमधून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे जिंकतील तर विद्यमान खासदार आणि उद्योगमंत्री अनंत गिते यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असेल. मात्र, खरे चित्र हे २३ मे र ोजी स्पष्ट होणार आहे.

पालघर जागा भाजपने जिंकली होती. पोटनिवडणुकीतही भाजपने बाजी मारली. मात्र, युती झाल्यानंतर ही जागा भाजपने शिवसेनेला सोडली. मात्र ही जागा शिवसेनेला राखता येणार नाही, असे चित्र दिसून येत आहे. ही जागा बहुजन विकास आघाडीला जाण्याची शक्यता आहे. येथे काँग्रेस आघाडीने बविआला पाठिंबा दिला आहे. याचा फटका युतीला बसतो आहे. त्यामुळे बविआचे बळीराम जाधव हे जिंकणार असून शिवसेनेचे राजेंद्र गावीत हरण्याची शक्यता आहे.

ठाणे येथे राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे आनंद परांजपे लढाई होत आहे. मात्र, राजन विचारे पुन्हा बाजी मारु शकतात, असे चित्र आहे.  

कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांच्यात लढत होत आहे. मात्र, शिकलेला उमेदवार हवा की न शिकलेला, असा प्रचार करत शिवसेनेने आक्रमक प्रचार केला. येथे श्रीकांत शिंदे विजयी होण्याची शक्यता अधिक आहे.

भिवंडीत भाजपचे कपिल पाटील जिंकण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसचे सुरेश टावरे यांना पराभव चाखावा लागू शकतो. 

 रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात पुन्हा शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत जिंकण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र स्वाभीमानी पक्षाचे नीलेश राणे यांना पराभवाचा धक्का बसणार आहे. तर काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर हे तिसऱ्या नंबर राहतील.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link