BREAKING - पुणे महापालिकेत ACB ची कारवाई, उप अभियंता एसीबीच्या जाळ्यात
पिंपरी-चिंचवडची घटना ताजी असतानाच पुणे महानगरपालिकेत एसीबीच्या कारवाईने खळबळ उडाली आहे
पुणे : पुणे महापालिकेत अँटी करप्शन ब्युरोने (ACB) कारवाई करत पालिकेतील उप अभियंत्याला अटक केली आहे. ठेकेदारीची बिलं काढण्यासाठी या उप अभियंत्याने लाच मागितली होती. एसीबीने सापळा रचून लाचखोर उप अभियंत्याला अटक केली आहे.
काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत स्थायी समिती अध्यक्षाला लाचखोरी प्रकरणी अटक करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुणे महानगरपालिकेत लाचखोर उप अभियंत्याला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रस्ते विभागाचा हा उप अभियंता असून त्याने 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. एका ठेकेदाराकडून बिलं काढण्यासाठी हे पैसे मागण्यात आले होते. या ठेकेदाराकडून लाच स्विकारताना एसीबीने सापळा रचून त्याला रंगेहाथ अटक केली.