Amit Shah On Shivsena: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) राजकीय प्रवासाचा आढावा घेणाऱ्या 'मोदी @ 20' (Modi @ 20 Book) या पुस्तकाच्या मराठी अवृत्तीचं प्रकाशन देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते करण्यात आलं. पुण्यात (Pune) आयोजित प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंबरोबर भाजपाने अन्य पदाधिकारीही उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये फडणवीस आणि शिंदे यांच्या भाषणानंतर अमित शाहांनी भाषण केलं. मात्र शाह हे बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा मंचावरील माईक बिघडला. थोड्यावेळाने माईक रिपियर झाल्यानंतर अमित शाहांनी पहिलच विधान केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिलेल्या निर्णयाबद्दल केलं. 


शिंदेंनी शिवसेना असा केला उल्लेख


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींच्या कार्याबद्दल भाष्य केलं. परदेशामध्येही मोदींची चर्चा असते असं शिंदे म्हणाले. डाव्होसला आपल्याला याची झलक पाहायला मिळाली, असंही शिंदे म्हणाले. यावेळेस शिंदेंनी 'कालच एक चांगला निर्णय आला' असं म्हणत निवडणूक आयोगाच्या निर्णयाबद्दल अमित शाहांसमोर उल्लेख केला. शिंदेंनी 2019 च्या विधानसभा निवडणुका शिवसेना आणि भाजपाने एकत्रित लढल्या. मात्र नंतर सरकार कोणाबरोबर झालं हे आपण पाहिलं. आम्ही ती चूक सुधारली, असंही म्हटलं. भाषणाच्या सुरुवातील शिंदेंनी 'भाजपा-शिवसेना युतीचा विजय असो,' अशाही घोषणा दिल्या. 


"कालच निवडणूक आयोगाने..."


शिंदेंच्या भाषणानंतर अमित शाह बोलण्यासाठी उभे राहिले मात्र माईक खराब झाला. काही मिनिटं माईक रिपियर करण्यात गेल्यानंतर अमित शाह बोलू लागले. अमित शाहांनी माईक हातात येताच भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. त्यानंतर शाह यांनी, "कालच निवडणूक आयोगाने दूध का दूध पानी का पानी केलं आहे. कालच सत्यमेव जयतेचं सूत्र अधोरेखित झालं. असं असताना असा आवाज असणार का माझा?" असं विधान माईक बंद झाल्याचा संदर्भ देत केलं.


विरोधी विचारसणीच्या लोकांचे तळवे चाटले


तसेच पुढे बोलताना अमित शाहांनी, "शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण खऱ्या शिवसेनेला मिळालं याबद्दल त्यांचं टाळ्या वाजवून अभिनंदन करा," असंही शाह म्हणाले. "आपल्या फोटोपेक्षा मोदींचा मोठा फोटो लावून प्रचार केला. देवेंद्र फडणवीस यांना नेते मानून त्यांनी निवडणूक लढवली आणि मुख्यमंत्रीपदासाठी विरोधी विचारसणीच्या लोकांचे तळवे चाटले," असा टोला शाहांनी लगावला.


मोदींच्या कामाचा घेतला आढावा


यानंतर अमित शाहांनी सर्व उपस्थितांना हाताच्या मुठी आवळून लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा निश्चय करण्याचं आवाहन केलं. "माझ्याबरोबर हात उंच करुन मुठी आवळा आणि महाराष्ट्रातील सर्व लोकसभेच्या जागा जिंकण्याचा संकल्प करा. मोठ्याने बोला भारत माता की जय," असं अमित शाह म्हणाले. अमित शाहांबरोबर इतरही उपस्थितांनी 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या. अमित शाहांनी आपल्या भाषणामध्ये मोदींच्या कार्याचा आढावा घेताना गुजरातमध्ये त्यांनी अनेक योजना सुरु केल्या. 24 तास लाईट, प्रत्येक घरात शौचालय यासारख्या योजना राबवणारं गुजरात हे पहिलं राज्य होतं असं सांगत अमित शाहांनी मोदींचं प्रशासन म्हणजे विकास असं सूचित करणारं विधान केलं. यानंतर अमित शाहांनी पूर्वीच्या सरकारमधील आणि आताच्या सरकारमधील धोरणांमध्ये कसा फरक आहे यासंदर्भातील आपली मतं मांडली.