पिंपरी : महाराष्ट्रातील पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार प्रकरणात नविन ट्विस्ट आले आहे. आमदाराच्या मुलाने आधी आरोपीला जबर मारहान केली त्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून आरोपीने फायरिंग केली होती. बुधवारी समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेज मधून ही बाब समोर आली आहे.  याआधी आण्णा बनसोडे यांनी आपल्यावर गोळीबार झाल्याचा आरोप केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार बनसोडे यांच्या मुलाने आपल्या समर्थकांसह आरोपीला जबर मारहान केली. त्यांनंतर स्वबचावात संतापात आरोपीने फायरिंग केली . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पालिकेच्या कचऱ्याच्या संदर्भातील ठेकेदारीवरून दोन गटात हा वाद झाला होता. 


बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थने आपल्या समर्थकांसह तानाजी पवारला किडनॅप केले. नंतर आपल्या कार्यालयात आणून जबर मारहान केली. यादरम्यान तानाजी पवारने फायरिंग केली.


पोलिसांनी राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे, त्यांचा मुलगा यांच्यासह 8 लोकांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.