पुणे : पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील संपर्क बाल अशाघर संस्थेतून 5 लहान मुलं बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंबवणे गावातील संपर्क बाल अशाघर या संस्थेतून 5 लहान मुलं बेपत्ता झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. संस्थेतील बेपत्ता मुलांना कुणीतरी फुस लावून पळवल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.



लहु मोरे (वय 11 वर्षे) , गणपत भुरीया उघडे (वय 11 वर्षे), सागर वाघमारे (वय 12 वर्षे),अभिषेक गायकवाड (वय 17 वर्ष) आणि नवनाथ पाटोळे (वय 16 वर्षे) ही मुलं बेपत्ता झाली आहेत.


मुलांबाबत माहिती मिळाल्यास पौड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण पोलिसांना कळवण्याचं आवाहन करण्यात आली आहे.