Pune Crime News : चुकीच्या कर्माची शिक्षा भोगावीच लागते असे म्हणतात. मात्र, बऱ्याचदा असे घडते की केलेल्या चुकीची लगेच शिक्षा मिळते. असाच काहीचा प्रकार पुण्यात घडला आहे. भाऊ आणि वहिनीवर हल्ला करुन तो पसार झाला. मात्र, त्याला फार दूर जाता आले नाही. वाटेतच त्याला मृत्यूे गाठले आहे.  भाऊ आणि वहिनीवर वार करुन फरार झालेल्या भावाचा अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे (Pune Crime News ).    


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याच्या शिरूर तालुक्यातील आंबळे ही घटना घडली आहे. सावत्र भावानेच भाऊ आणि वहिनीवर चाकुने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात वहिनीचा मृत्यू झाला आहे. तर, भाऊ गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर आरोपी भावाचा देखील मृत्यू झाला आहे. 


अनिल बेंद्रे असे मृत आरोपीचे नाव आहे. तर,  प्रियांका ब्रेंद्रे ( वय 27) असे त्याच्या मृत वहिनीचे नाव आहे. भाऊ सुनिल ब्रेंद्रे ( वय 30 ) गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर पुण्यातील रूबी हॉस्पीटल मध्ये उपचार सुरू आहेत. 


नेमकं घडल काय?


सुनिल आणि प्रियांका पुण्यामध्ये आयटी कंपनीत जॉब करत होते . 1 में रोजी ते लंडनला जॉबसाठी येथे जाणार होते.तसेच आरोपी अनिल हा देखील पुण्यात एका बड्या कंपनीत काम करत होता. मात्र त्याच्या वागण्यामुळे तीन वेळा जॉब बदलावा लागला.  काही महिन्यापूर्वी त्याचे कंपनीतील काम गेल्यामुळे  तो वैफल्यग्रस्त झाला होता.
यावरुन घराता त्याचे सतत वाद होत होते. कौटुंबीक वादाच्या कारणातून आरोपीने भाऊ आणि वहिनीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात वहिनीचा जागीच मृत्यू झाला. तर भाऊ गंभीर जखमी झाला. आरोपी भयभित झाला आणि त्याने घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र, वाटेतच त्याला अपघातात झाला. या अपघातात आरोपी जागीच ठार झाला.  या प्रकरणाचा पुढील तपास आता शिरूर पोलिस करत आहेत.