Pune Crime News : संस्कृतीचे माहेरघर अशी पुणे शहराची ओळख आहे. याच पुण्यात एक अत्यंत धक्कादायक आणि मातृत्वाला काळिमा फासणारी घटना घडली आहे (Crime News ). जन्मदात्या आईने नवजात बालकाला टॉयलेटच्या खिडकीतून फेकले आहे. ही महिला रुग्णालयात उपचार घेत होती. ती 8 महिन्यांची गरोदर होती तरी हॉस्पीटलमधील कुणालाच काहीच समजले नाही. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 


नेमकं काय प्रकरण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपी महिला ही 19 वर्षांची तरुणी आहे. अनैतिक संबंधातून ही 19 वर्षीय तरुणी गर्भवती राहिली होती. त्यानंतर ती पाठीच्या दुखण्याचे कारण सांगून एका रुग्णालयात दाखल झाली होती. तिने एका बालकाला जन्म दिला. याविषयी कोणाला काहीही न सांगता तिने नवजात बालकाला रुग्णालयाच्या खिडकीतून खाली फेकून दिले.


सिंहगड परिसरातील नवले पुल रस्ता परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.  एका रुग्णालयात घडली आहे. या प्रकरणी आरोपी तरुणी विरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


तरुणी सिंहगड रस्ता परिसरातील एका वसतीगृहात राहते. अनैतिक संबंधातून ती गर्भवती राहिली होती. दरम्यान, आठ महिने झाल्यानंतर ती पाठीच्या आजाराचे कारण सांगून नऱ्हे परिसरातील एका रुग्णालयात दाखल झाली. पाठ दुखत असून, अशक्तपणा जाणवत असल्याचे तिने रुग्णालयात सांगितले.


गर्भवती असल्याचे तिने रुग्णालयापासून लपवून ठेवले होते. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना हॉस्पीटलमधील  कर्मचाऱ्यांना ती गर्भवती असल्याबाबत काहीच कसे समजले नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  रुग्णालयात दाखल असतानाच या तरुणीला प्रसुती कळा सुरु झाल्या. ती  स्वच्छतागृहात गेली. तिथे तिने बालकाला जन्म दिला. यानंतर काहीही विचार न करता तिने नवजात बालकाला रुग्णालयाच्या खिडकीतून बाहेर फेकून दिले. या घटनेत नवजात बालकाचा मृत्यू झाला. 


रस्त्यावर नवजात बालक दिसल्याने खळबळ


रुग्णालयाच्या आवारात रस्त्यावर नवजात बालक आढळून आल्याने खळबळ उडाली. स्थानिकांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी तपास केला असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. आरोपी तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस या प्रकरणी अधित तपास करत आहेत.